सबंध मानवतेच्या मुक्तीचा हा महाग्रंथ आहे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ वाचले तर कळेल. बाबासाहेबांनी वैदिक - ब्राह्मणी हिंदू धर्म व्यवस्थेचा विशुद्ध अंत:कारणाने अगदीच खोलात जाऊन अभ्यास केला आहे. भारतामधील संपूर्ण शोषित-पीडित समाजाची उन्नती व्हावी त्यांचा स्वाभिमान जागृत व्हावा म्हणून आयुष्यभर झटले "शुद्र मुळचे कोण आणि ते इंडोआर्यन समाजात चतुर्थवर्ण म्हणून कसे मानले गेले ? हा ग्रंथ बाबासाहेबांनी 1946 साली लिहिला आणि अस्पृश्य मुळचे कोण ? हा ग्रंथ 1948 साली लिहिला आहे. याही आगोदार 29 वर्षाआदि बाबासाहेब 26 मे 1929 साली स्वाभिमान परिषद भरवितात आणि सर्व बंधनातून मुक्त होण्यासाठी अस्पृश्य बांधवांनी स्वाभिमान जागृत करून माणुसकीच्या हक्कांसाठी निकाराचा हल्ला करण्याचा संदेश देतात या परिषदेत 6 ठराव पास झाले सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य वर्गाला व कनिष्ठ वर्गाला मज्जाव नसावा हा त्यातील एक ठराव" ब्राह्मणी व्यवस्थेने भारतीयांच्या मनात ब्राह्मणी वर्गाबद्दल व ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल भीतीयुक्त आदर निर्माण केला याचा परिणाम स्वरूप शुद्रसुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम झाले. एकेकाळचा क्षत्रिय असणारा लढाऊ वर्ग ब्राह्मण, क्षत्रिय व वेश्य या तिन्ही वर्गाचा दास झाला. *मनुस्मृतीतील अंतरंग जरा समजून घेऊ सर्व एससी, एसटी आणि ओबीसी समाज या विषयीमनुस्मृती म्हणते*
*👉🏻 विश्वनिर्मात्याने शुद्राला ब्राह्मणाचे गुलाम म्हणून निर्माण केले असल्याने ब्राह्मणाने शुद्राला मोबदल्यासह किंवा विना मोबदला गुलामगिरीचे काम करणे भाग पाडावे. 8 (413 )*
*👉🏻 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णातील लोकांची सेवा करणे एवढेच काम परमेश्वराने शूद्रांना दिले आहे.*
*👉🏻 शुद्राच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाने जर अन्य तिन्ही वर्णातील लोकांना दुखापत झाली तर त्याचा तो अवयव कापून टाकावा ही मनूची शिकवण आहे. 8( 279 )*
बाबासाहेबांनी "मनुस्मृती" नावाचा धार्मिक ग्रंथ जाळला
*👉🏻"हिंदू संस्कृतीला संस्कृती म्हणता येणे कठीन आहे.*
*ज्युन्या सनातनी हिंदू आणि नवीन आधुनिक हिंदू यांची नीच रुत्ती बाबासाहेब मांडून थांबत नाही तर ते सामाजिक संस्थांचा अभ्यास करणाऱ्या परदेशी विद्वानांचेही लक्ष या अस्पृश्यतेकडे गेले नाही हेही सूक्ष्मनिरीक्षणाअंति आपल्या प्रस्तावनेत मांडतात ईथपर्यन्त आपले संशोधन बाबासाहेबांनी या ग्रंथात केले आहे.* इतकेच नव्हे हिंदूसंस्कृती अत्यंत पुरातन प्राचीन असलेल्या बाबींचा त्यांनी पुरावा या पुस्तकात दिली आहे.
शुद्राशिवाय हिंदू संस्कृतीने आणखी तीन सामाजिक वर्गाना जन्म दिला ते तीन वर्ग
*👉🏻 1. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमाती. यांची लोकसंख्या सुमारे दोन कोटींच्या जवळपास आहे.*
*👉🏻 2. आदिवासी जमाती. यांची लोकसंख्या अंदाजे दीड कोटीच्या जवळपास आहे.*
*👉🏻 3. अस्पृश्य मानलेल्या जाती. यांची लोकसंख्या अंदाजे 5 कोटी आहे.*
हिंदू संस्कृतीला संस्कृती म्हणता येणे कठीन आहे. मानवतेवर बंधने लादून तिला गुलाम बनविण्याचा हा एक अधमपणाचा कावा आहे. असेच तिच्यासंबंधी म्हणावे लागेल. 'बदफैलीपणा' हेच नाव तिला शोभून दिसेल. जीवननिर्वाहाचे एकमेव साधन म्हणून केवळ दरोडेखोरीचा धंदा करण्याची शिकवण देऊन ज्या संस्कृतीने एक मोठा दरोडेखोरीचा लोकसमूह पैदा केला. आधुनिक सुधारलेल्या काळातही जिने एक मोठा लोक समूह रानटी अवस्थेत प्राचीन पशूतुल्य जीवन जगण्यासाठी मोकाट सोडून दिला आणि जिने तीसरा एक लोकसमूह असा करून ठेवला की त्याच्याशी कोणताही मानवी व्यवहार शक्य होऊ नये; आणि केवळ त्यांच्या स्पर्शानही मानव भ्रष्ट होऊन जावा. अशा संस्कृतीला बदफैलीपणाशिवाय दूसरे काय म्हणता येऊ शकेल ? यापुस्तकात ते ब्राह्मणांना उद्देशून म्हणतात "आज सर्व प्रकारची विद्वत्ता केवळ ब्राह्मणांपर्यन्त मर्यादित झालेली आहे. परंतु खेदाची गोष्ट अशी की व्हॉल्टेअरप्रमाणे बौद्धिक प्रामाणिकतेचे पालन करण्याची भूमिका पार पाडण्यासाठी कोणताही ब्राह्मण पंडित पुढे सरसावला नाही. ब्राह्मण पढिक केवळ विद्वान असतो, तसे बुद्धिवादी नसतो, याही पुढेजाऊन बाबासाहेब ब्राह्मणांविषयी म्हणतात "ब्राह्मणशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव तत्वांचा अभाव" हे बाबासाहेबांनी 1936 साली अधारिकित केले होते "ब्राह्मणांनी व ब्राह्मणेतरांनी जेव्हा गोमास भक्षण बंद केले व वाताहत झालेल्या लोकांनी जेव्हा ते चालू ठेवले तेव्हा जुन्या स्थितिहून एक नवीन परिस्थिती उद्भवली जुन्या स्थितीत सर्वच लोक गोमास खात होते परंतु नव्या स्थितीत एक वर्ग गोमास वर्ज्य मानीत होता तर दुसरा गोमास खात होता. ऐकाकाळी ब्राह्मण सर्वांपेक्षा जास्त प्रामाणात गोमास भक्षक होते अब्राह्मण गोमास खात असले तरी ते दररोज खात नव्हते. गाय हे एक अतिशय महाग जनावर होते आणि त्यामुळे केवळ भोजनासाठी तिला मारणे त्यांना आवडत नसे त्यांचा एखादा धार्मिक विधी असल्यास किंवा त्याच्या व्यक्तीगत हितासाठी एखाद्या देवतेला बळी देणे अनिवार्य असल्यासच ते अशा ख़ास प्रसंगी गाय मारित असत. परंतु ब्राह्मणांच्या बाबतीत असे नव्हते तो उपाध्याय होता धार्मिक कर्मकांडांनी लदलेल्या त्या काळी कोणीही अब्राह्मणाच्या घरी असा गायीला बळी देण्याची धार्मिक कार्यक्रम नाही व त्यामुळे ब्राह्मणांना निमंत्रण मिळाले नाही. असा दिवस क्वचितच असे ब्राह्मणांसाठी प्रत्येक दिवसच गोमासाहाराचा दिवस होता. म्हणून ब्राह्मण सर्वात जास्त गोमास भक्षक होते. धर्माच्या नावावर चालणारे ब्राह्मणांचे यज्ञ म्हणजे केवळ निरपराध प्राण्यांच्या हत्येशिवाय अन्य काहीही नव्हते. याचे पुरावे म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्यात धर्म ग्रंथाचे या ग्रंथात दिले आहेत याच ग्रंथात बाबासाहेब हे स्पष्ट लिहितात "बौद्ध धम्माने गोहत्येचा निषेध केल्यामुळे त्याने जनतेच्या मनाची पकड घेतली होती बौद्ध धम्म व अहिंसा यांचा संबंध अत्यंत घनिष्ट व अनिवार्य स्वरूपाचा आहे.
ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका,दक्षिण आफ्रिका, इफात, युगांडा, मलाया पेनिन्सुला, न्यूझीलंड,ग्रीक, रोमन इत्यादि देशातील रीतीरिवाजाचे दाखले त्यांनी भाग 1 अहिंदूतील अस्पृश्यता या सदरात दिले आहेत. अस्पृश्यतेचा उगम या ग्रंथात बाबासाहेब नोंदवितांना अंदाजे इ. सन 400 च्या दरम्यानचा दाखला देतात आणि म्हणतात ती बौद्धधम्म आणि ब्राह्मणवाद यांच्या संघर्षातून जन्माला आली असून या संघर्षाने भारताचा इतिहास घडविला. भारतीय इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी या संघर्षाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले ही खेदाची बाब ते जाहिर प्रकट या ग्रंथाच्या शेवटी करतात. हाच माणूसपणाचा शोध डॉ बाबासाहेबांनी या ग्रंथातुन मांडला आहे एवढेच नव्हे तर "पुरातन गोष्टीकडे ते आधुनिक दुरदृष्टीने पाहाण्याचा मार्ग त्यांनी जगाला दाखविला आहे. अत्यंत हिन ठरलेल्या जमातीना बाबासाहेबांनी पूर्णपणे न्याय मिळवून दिला आहे. आपण आवश्यक वाचाच मी एक भारतीय नागरिक म्हणून ही माझी आट्ठाहास नाही पण अपेक्षा आहे.
- संदिप महाडीक ( क्रांतीभूमी ) 9222437849
*THE UNTOUCHABLE*
मूळ इंग्रजी पुस्तक
*अस्पृश्य मुळचे कोण ? आणि ते अस्पृश्य कसे बनले"*
लेखक - डॉ बाबासाहेब आंबेडकर
अनुक्रमाणिक
भाग 1
*👉🏻 1. अहिंदूतील अस्पृश्यता*
*👉🏻 2. हिंदूतील अस्पृश्यता*
भाग 2
*👉🏻 3. अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात ?*
*👉🏻 4. अस्पृश्य हे वाताहत झालेले लोक आहेत काय ?*
*👉🏻 5. अन्यत्र अशी उदाहरण आहेत काय ?*
*👉🏻 6. अशा विभक्त वसाहती अन्य देशातून नष्ट कशा झाल्या ?*
भाग 3
*👉🏻 7. अस्पृश्यतेचे मूळ :- वंशभेद*
*👉🏻 8. अस्पृश्यतेचे मूळ :- उद्योगधंदे*
भाग 4
*👉🏻 9. अस्पृश्यतेचे :- बौद्ध धम्माचा तिरस्कार*
*👉🏻 10. अस्पृश्यतेचे मूळ :- गोमास भक्षण*
भाग 5
*👉🏻 11. हिंदुंनी गोमास कधीही खाल्ले नाही काय ?*
*👉🏻 12. ब्राह्मणेतरांना गोमास भक्षणाचा त्याग का केला ?*
*👉🏻 13. ब्राह्मण शाकाहारी कशामुळे बनले ?*
*👉🏻 14. गोमास भक्षणाने वाताहत झालेले लोक अस्पृश्य कसे बनले ?*
भाग 6
*👉🏻 15. अशुद्ध आणि अस्पृश्य*
*👉🏻 16. वाताहत झालेले लोक अस्पृश्य केव्हा बनले ?*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा