।।अखेर विजय भिम नामाचा।।
भीम सैनिकांच्या आंदोलनावर पोलीसांचा लाठीहल्ला
पड़घा पोलीसांच्या हद्दीत " कुंरुंद ग्राम पंचायत नें" डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर " असे नामकरण केलेल्या प्रवेश कमानीवर काही समाजकंठकांनी पोलीसांच्या सहकार्यानें त्यां कमानी ला सागर नगर नांव दिल्याने संतापलेल्या हजारो भीम सैनिकांनी आज पोलीसांच्या जुलुमीलाठीचार्ज ला न जुमानता " सागर " नावांची तोड़फोड़ करून " डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर " असे नांव पुन्हा झलकावले . त्यां वेळी पोलीस अधिकारी भास्कर पुकले यांनी कोणताही शासकीय आदेश नसतांना जमलेल्या " भीम सैनिकांवर अंधाधुंध लाठीचार्ज केला . त्यां हल्ल्यात महिला , लहान मुले जखमी झाले आहेत . दोन तरुणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना " भीवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालय " येथे दाखल केले आहेत . डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर " असा ठराव मंजूर असताना स्थानिक भाजपा खासदार कपिल पाटील यानी जातीय अकासापोटी काही समाजकंठकाना हाताशी धरून " दिवंगत सागर सोष्टें हया बालकाचे नांव देण्याचा अट्ठाहास धरल्याचा आरोप अँड . किरण चंन्नें साहेब व अन्याय अत्याचार कृती समिती तसेच फुले,शाहु,आंबेडकरी जनतेनी केला आहे. 25ऑगस्ट 2017रोजी त्यां कमानीवरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर हे नांव कमी करून " सागर नगर " " असे नामकरण केले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार " असे नाम हनन केल्यानें स्थानिक आंबेडकरी जनतेत प्रचंड चीड निर्माण झाली होती . आज दि.०३/१०/२०१७ रोजी आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन " सागर " हे नांव तोडून टाकले . पडघा पोलीस स्टेशनचे निरिक्षक भास्कर पुकले यांनी अंधाधुंध लाठीचार्ज केला त्यां मुळे परिस्थिती हाता बाहेर जात होती . अँड . किरण चंन्नें साहेब,तसेच अन्याय अत्याचार कृती समिती व त्यांच्या सोबत अनेक जातीधर्मातील , पक्षातील नेते " कुंरुंद " येथे येऊन सामंजस्य भूमिका घेऊन वातावरण हाताळले . उप विभागीय पोलीस अधीक्षक श्री . विशाल ठाकुर सो . तहसीलदार गायकवाड साहेब भीवंडी हे पडघा पोलीस स्टेशनला उपस्थित राहुन आंदोलन कर्त्याची बाजू ऐकून घेतली . त्यांनी पोलीसांचा लाठीचार्ज हा अनावश्यक होता हे मान्य केले . जखमीना योग्य उपचार केला जाईल , डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर हे नांव पुन्हा अबाधित राहील, सम्पूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल ,तसेच कमानीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पुर्ववत नाव २तासात लावुन देवु असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले .सामाजिक जाण व बांधिलकी असलेला भिमबांधव ह्या ऐतिहासीक आंदोलनाला जातीयतेने,पोलिसांचा लाठीमार सहन करुन उपस्थित राहुन ,सामाजिक आव्हान स्विकारुन समाजकंटकांना त्यांची जागा दाखवुन दिली,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या नावाचं मान सन्मान कायम राखलं त्या तमाम आंबेडकरी भिमबांधवांचा मनापासुन हार्दीक आभिनंदन.
मोर्च्याचं नेत्रु्त्व मुख्यत किरण चन्ने,सुरेश जाधव,प्रमोद जाधव,पंडीत गायकवाड,संतोष चव्हान,शितल गायकवाड,शशिकांत जाधव,सचिन जाधव,संध्या सरदार,भरत जाधव,पंकज गायकवाड,प्रशांत जाधव,कैलास जाधव,अजय गोरे,योगेश गायकवाड,ऊमेश सोनावणे,अनिल वाणी,नितीन तांबे,मिलिंद जाधव,रितेश जाधव,सागर धनगर,सुजित जाधव,सिद्धार्थ गोरे,शैलेश जाधव ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं तसेच सुरेश जाधव आणि त्यांच्या टिमने हे प्रकरण गेल्या २महिन्यांपासु डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर नाव लागण्यासाठी व्यवस्थितरित्या हाताळला आहे ,एेव्हड्या दिवसांची मेहनत व मोर्च्याला आलेल्या प्रत्येक भिमबांधवांच्या सहकार्याने हे एतिहासिक कार्य संपन्न झाले आणि अखेर विजय भिम नामाचा झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा