१. दरडोई उत्पन्न कमी : विकसित देशाच्या तुलनेत भारतात दरडोई उत्पन्न कमी आहे. २००२ मध्ये विनिमयाद्वारे भारताचे दरडोई उत्पन्न ४८० डॉलर होते, तर २००९ साली ते ११८० डॉलर होते.
२. अतिरिक्त लोकसंख्या : भारताची लोकसंख्या उपलब्ध साधनसामग्रीच्या तुलनेत खूप जास्त आहे. लोकसंख्या वाढीमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीपेक्षा दरडोई उत्पन्नातील वाढ खूपच कमी राहते.
३. बेकरीचे वाढते प्रमाण : भारतात ग्रामीण भागात अर्ध बेकारी, छुपी बेकारी, तर शहरी भागात सुशिक्षतांची बेकारी मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारतात लोकसंख्येत ज्या वेगाने वाढ झाली आहे त्या प्रमाणात शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रात रोजगार संधी निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे दारिद्र्यात भर पडत गेली.
४. आर्थिक विषमता : देशातील संपत्तीचे, उत्पन्नाचे वाटप, देशातील लोमकांमध्ये समान प्रमाणात झालेले नाही. उत्पन्न व संपत्तीचे विषम वाटप झाल्यामुळे गरीब व श्रीमंत यामधील दरी मोठी आहे.
५. निरक्षरतेचे प्रमाण : भारतात दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. निरक्षर लोकांची कार्यक्षमता साक्षर लोकांपेक्षा कमी असते. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण ७५ % च्या आसपास आहे. अजूनही देशात २५ % पर्यंत लोक निरक्षर आहेत.
६. हरित्क्रांतीचा परिणाम : देशात हरित्क्रांती घडून आली. मात्र त्याचा फायदा गरीब शेतकऱ्यांपेक्षा श्रीमंत शेतकऱ्यांनाच अधिक असल्याने त्यांना प्रगती करता आली. याउलट अल्पभूधारक व ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे त्यांना फायदा मिळाला नाही.
७. नवीन आर्थिक धोरण : सरकारी उद्योगांचे खासगीकरण, उदात्तीकरण, वित्तीय तूट कमी करणे इत्यादी उद्दिष्टे असलेल्या नवीन आर्थिक धोरणाने बेकरीचे प्रमाण म्हणावे तितके कमी झाले नाही परिणामी दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
८. इतर कारणे :
अ ) विकासाचा अल्प वेग
ब ) वाढती किमतवाढ
क ) शेतजमिनीच्या वाटपात विषमता
ड ) शेतीची अल्प उत्पादकता
इ ) दारिद्र्य निर्मूलनाचे अपुरे प्रयत्न
फ ) भ्रष्टाचार इ.
संदर्भ : पान नं. ४७५, MPSC-CSAT परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक, डॉ. आनंद पाटील...
Thank you so much. It's short and pointedly notes .
उत्तर द्याहटवा