सोमवार, २७ जानेवारी, २०२०

प्रजासत्ताक दिन आणि प्रजेची सत्ता .... ( संपादक : अमोल वाघमारे )

     आजचा दिवस प्रजासत्ताक दिवस,प्रजेची म्हणजेच देशातील सर्व जनतेची सत्ता आजपासून सुरु झाली. जनतेचे सरकार असणार आणि ते त्यांच्यासाठीच काम करणार पण कोणत्या जनतेसाठी हा देश तर बहुविध समाजाचा विविध जाती,धर्म,प्रांत गरीब,श्रीमंत यात विभागणी झालेला देश यातील कोणत्या समुदायाच्या जनतेची सत्ता असणार तर आपल्या सर्वाना कल्पना आहे कि प्रत्येकाला एका मताचा अधिकार घटनाकरांनी देऊन सर्वानाच या सत्तेचे धनी बनवले.आणि या प्रजेच्या वतीने येणारे सरकार हे देशातील सर्वच लोकांच्या प्रती उत्तरदायी असणार हे घटनाकारांनी नुसते बजावले नाही तर तशी तरतूद केली पण आज काय ...........
     सत्तेवर आलेली सरकारे आणि या सरकार च्या वतीने कारभार करणारी प्रशासने समाजातील सर्व जनतेला उत्तरदायी आहेत,प्रजेची सत्ता असून याच प्रजेतील सामान्य माणसांची शेवटच्या घटकातील माणसांची आजची अवस्था काय ??  कुठे आहे तो  ??  काय म्हणतोय तो ??? सत्तेचे विकेंद्रीकरण झाले कि सत्तेचे केंद्रीकरण झाले,धनाचे वाटेकरी घामकरी झाले का ?? घटनेतील बंधुभाव हा खराखुरा जाणीवेत व व्यवहारात उतरला का ?? कितीतरी प्रश्न,प्रश्न आणि प्रश्नच 
     प्रश्नांच्या कोलाहलात उत्तरांची वाट शोधावीच लागेल.....उत्तरांची वाट शोधून थांबणार नाही तर त्या वाटेने चालताना त्या वाटेचा,मार्ग कसा विस्तारेल यासाठी अथक प्रयत्न करावेच लागतील. लोकशाही शासनप्रणाली नसून ती आमची जीवनप्रणाली कशी बनेल यासाठी प्रयत्न करतानाच शेवटच्या घटकापर्यंत संधी आणि दर्जाची समानता उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्यशील राहणे,व मानव आणि सृष्टीची परस्परपूरकता वाढवत समतेकडे,बंधूतेकडे,न्यायाकडे कूच करत राहणे हाच प्रजेच्या सत्तेचा राजमार्ग होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा