शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

हजारो कष्टकरी जनतेचा आंबेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा - संपादक  - अमोल वाघमारे 

हजारो कष्टकरी जनतेचा आंबेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा , वनविभागाची अखेर माघार
 अनेक महत्वपूर्ण मागण्या मंजूर ....


आंबेगाव तालुक्यातील,( जिल्हा पुणे ) येथील  आदिवासी,कष्टकरी, शेतमजूर, निराधार पेन्शनधारक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसानसभा संघटनेच्या नेतृत्वाखाली दि.२८-१-२०२० रोजी तहसील कार्यालय,घोडेगाव येथे हजारो कष्टकरी समुदायांचा मोर्चा  काढण्यात आला होता. यावेळी या प्रश्नांच्या अनुषंगाने सबंधित अधिकारी उपस्थित राहून रात्री ८ वाजेपर्यंत संघटनेने मांडलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.




 मान्य झालेल्या मागण्या :

🎋 वनविभागाशी निगडीत मंजूर मागण्या :

वनविभागाने पेसा कायद्याअंतर्गत समावेश झालेल्या गावाच्या ग्रामसभेची मान्यता न घेता सुरु केलेल्या सर्व आंबेगाव तालुक्यातील जंगल जमिनीला कंपौंड घालण्याच्याच्या कामांना स्थगिती देण्याची संघटनेची मागणी मान्य केली  गेली.

व या गावात हे कंपौंडचे काम सुरु ठेवावे कि बंद करावे याचा निर्णय गावाच्या ग्रामसभेतच  केला जाणार. 

पुढील १५ दिवसात सबंधित गावात ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत.

आदिवासी जनतेची फसवणूक करून जे वनकर्मचारी बेकायदेशीर दंड वसूल करणेसाठी प्रयत्न करत होते, अशा कर्मचारी यांच्याविषयी चौकशी करणेसाठी चौकशी समिती नेमून पुढील १५ दिवसात हि चौकशी समिती आपला अहवाल देईल व त्यानंतर सबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल.

 रॉकेल व रेशनविषयक मंजूर मागण्या :

रॉकेल नियमित ग्रामीण भागातील लोकांना मिळावे यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला जाईल.

याबरोबरच ज्या लोकांना गॅस मिळाला नाही व रॉकेल हि मिळत नाही,अशा लोकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना रॉकेल दिले जाईल.

प्रत्येक रेशन दुकानात तक्रारवही,धान्याचे नमुने,दुकानाचा बोर्ड लावण्याचे आदेश दुकानदार यांना दिले जाईल व दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश ग्रामपंचायत यांना दिले जाईल.

 रोजगार हमी विषयक मागण्या :

पुढील एक महिन्यात आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात रोजगार हमी कायद्याअंतर्गत सामुहिक कामांचा शेल्फ तयार करून पुढील महिन्यापासून मागेल त्याला काम दिले जाईल.

पडकईची कामे रोजगार हमी योजनेतून घेतली जातील.ज्या-ज्या गावातून मागणी येईल तेथे रोजगार हमीतून पडकई ची कामे सुरु केली जातील.

रोजगार हमी अंतर्गत बिहार patarn अंतर्गत जे खड्डे मागील वर्षी खोदले आहेत तेथे झाडे लावली गेली नाही. या प्रकरणात दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

राजपूर येथे १ वर्षापूर्वी काम मागणीचे अर्ज मजुरांनी देऊन काम सुरु न केल्याबद्दल सबंधित मजुरांना बेरोजगार भत्ता देणे बाबत कारवाई केली जाणार आहे.

 आदिवासी वनाधिकार कायदा विषयक  :

प्रत्येक गावाला सामुहिक वनहक्क कसा मिळेल यासाठी कालबद्ध कार्यक्रम करणे बाबत आदिवासी प्रकल्प कार्यालय यांचेसोबत स्वतंत्र बैठक होणार आहे.

 रस्ते विषयक : 

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी,ग्रामीण भागात जे रस्ते अपूर्ण आहेत जेथे रस्ते अद्याप पोहचले नाहीत अशा ठिकाणी रस्ते मंजूर होणेसाठी स्वतंत्र प्रस्ताव जिल्हा परिषदेस पाठवून संघटना 
पदाधिकारी व प्रशासन पाठपुरावा करणार.

 निराधार पेन्शन विषयक मंजूर मागण्या : 

महाराष्ट्र शासनाने घोषित केल्यानुसार १००० रुपयाप्रमाणे निराधार पेन्शन सप्टेंबर २०१९ या महिन्यापासून मिळणार.

सप्टेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या दरम्यानचा फरक १५ फेब्रुवारी २०२० च्या आत निराधार पेन्शनधारक यांच्या खात्यात जमा होणार.

 नवीन पेन्शन धारक यांना दारिद्र्यरेषेचा दाखला देणेसाठी ग्रामसेवक व व २१,००० रुपयाचा उत्त्पनाचा दाखला देणेसाठी तलाठी यांना आदेश दिले जातील.

 आरोग्यविषयक मंजूर मागण्या :

तालुक्यातील आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापुढे एकतरी  निवासी डॉक्टर असतील .जे डॉक्टर राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 

तळेघर येथील सुरु असलेली १०८ रुग्नवाहिका मागील चार महिन्यांपासून बंद होती हि रुग्णवाहिका डॉक्टर सहित आजपासून म्हणजेच 
दि.२८-१-२०१९ या दिनांकापासून सुरु करण्यात आली आहे.हि रुग्णवाहिका यापुढे नियमित सुरु राहणार आहे.

तिरपाड किंवा अडवीरे याठिकाणी नव्याने १०८ रुग्णवाहिका त्वरित सुरु व्हावी. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल.

 वीज विषयक मंजूर मागण्या :

भरमसाठ वाढीव वीजबिले कमी करणेसाठी तळेघर व अडविरे येथे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व बुधवारी वीज अधिकारी येऊन हि वीज बिले कमी करणार.

नादुरुस्त मीटर काढून कोणताही चार्ज न घेता हे मीटर बदलून देणार.

जास्त रक्कमेचा वीज बिलाचा फुगवटा रद्द करून चालू रीडिंग प्रमाणे वीज आकारणी केली जाणार.

कुशिरे येथील बिबळेवस्ती येथे वीज नव्हती.याठिकाणी नव्याने वीज कनेक्शन मंजूर झालेले आहे.हे काम तातडीने सुरू केले जाईल.

 इतर मागण्या : 

१.तिरपाड,अडिवरे व तळेघर येथे बाजाराच्या दिवशी तलाठी उपस्थित राहून कामकाज करतील.

✊ या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ad.नाथा शिंगाडे,
सचिव डॉ.अमोल वाघमारे,
उपाध्यक्ष  महेंद्र थोरात,
तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर,
सचिव अशोक पेकारी,
उपाध्यक्ष राजू घोडे,याबरोबरच अमोद गरुड यांनी केले होते.

✊किसान सभेचे व एस.एफ.आय संघटनेचे तालुका पदाधिकारी अशोक जोशी,ज्ञानेश्वर मेमाणे,रामदास लोहकरे,सुभाष भोकटे,गणेश काटले,दत्ता गिरंगे,देविका भोकटे,जिजाबाई केंगले,नंदा मोरमारे,लक्ष्मण मावळे, सुरेश आंबवणे,पुंडलिक असवले,रामभाऊ भांगे,शैला आंबवणे,अविनाश गवारी,तृप्ती दुर्गुडे,समीर गारे,सागर पारधी, अनिल सुपे, रोहिदास गभाले इ. यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले होते.



चर्चेस उपस्थित अधिकारी

मा.तहसीलदार  

मा.गटविकास अधिकारी  

मा.वनपरिक्षेत्र अधिकारी

मा. सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या प्रतिनिधी

मा. जिल्हा व्यवस्थापक,108 रुग्णवाहिका

मा.सहाय्यक वीज कार्यकारी अधिकारी

मा.तालुका कृषी अधिकारी

मा.तालुका आरोग्य अधिकारी  

मा.पंचायत समिती बांधकाम विभाग प्रमख

सहाय्यक प्रकल्प अधिकारी,नरेगा विभाग 

मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक 

मा.तालुका पेसा समन्वयक

मा.प्रकल्प कार्यालय घोडेगाव प्रतिनिधी

या सर्व मान्य मागण्यांचे लेखी आश्वासन संघटनेला आज प्राप्त होत आहे.

स्वातंत्र्य !
लोकशाही !!
समाजवाद !!!
✊झिंदाबाद✊

 लढेंगे ✊✊
 जितेंगे ✊✊✊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा