महाकवी नामदेव ढसाळ यांची सुंदर कविता.......
.
*मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला*
दोन वर्ग शिकला नसंन
पण मोठा माज आला ......
.
पडुन होता पोयट्यासारखा
घोंगवत होत्या माशा
नवता कपडा आंगावर
खराब होती दशा
आरक्षणच्या माथ्यावर
खुप मोठा साहेब झाला
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला.....*
.
खुप होत्या पोथ्या
अन् खुप होते देव
दररोज वात लावुन
म्हणे मले सुखी ठेव
पहील्या वर्गापासुन
खुप सवलत घेत आला.....
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला........*
.
नवतं त्याच्या पिढीत
कधी कुणी शिकलं
वावरात नारळ फोडुन
कधी नाही पिकलं
बांधावरचं पाणी
दिमाखानं घेत आला.....
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला.....*
.
ज्यानं केला राग त्याचा
त्याच्या मागं धावला
त्याच्या सांगण्यावरुन
फोटो नाही लावला
त्याचं जड पारडं
तु हलकं करत आला...
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला.....*
.
तुले नवतं माहीत
तु आहे कोण
कायदयाच्या नावानं
करत हात दोन
तु आता कायदा
लोकाले सांगत आला......
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला .....*
.
नाही आपली अक्कल
भिमावानी केली
त्याच्या एवढ शिकावं
हिम्मत नाही केली
दम नाही रक्तात
पण जातीभेद करत आला.....
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला......*
.
आतातरी सुधर
सोड आता गर्व
धर्मग्रंथाच्या नावानं
करुन दाखव सर्व
माहीत असुन तुले
मस्त नाटक करत आला ......
*अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला ......*
जय भीम - कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जय भीम - कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७
मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)