जातीय अत्याचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जातीय अत्याचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ 100 दलितांनी गाव सोडलं; तलावाजवळ मुक्काम, महाराष्ट्राला झालंय काय ?

 


जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीतील 100 दलितांनी गाव सोडलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारी ही घटना आहे. एकविसाव्या शतकात मानवाने प्रगतीचे इमले बांधले पण जातीयवादाची भिंत पाडण्यात त्याला कुठली अडचण येतीय, हे कळायला अद्याप मार्ग नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  •  
  • Publish Date - 1:10 pm, Sat, 23 October 21

अमरावती : महाराष्ट्र कायम फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो पण आणखीही त्यांची शिकवण आचरणात का आणत नाही? हे विचारण्याचं कारण म्हणजे जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीतील 100 दलितांनी गाव सोडलं आहे. अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारी ही घटना आहे. एकविसाव्या शतकात मानवाने प्रगतीचे इमले बांधले पण जातीयवादाची भिंत पाडण्यात त्याला कुठली अडचण येतीय, हे कळायला अद्याप मार्ग नाही.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवारी गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आपले ठाण मांडले असून, पून्हा गावात परतणार नाही असे निर्णय घेतला आहे.

त्यामुळे गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे. आमच्यावरील अत्याचार कधीपर्यंत आम्ही सहन करणार, असा संतप्त सवाल करुन आता आम्हाला या गावात राहण्यास काडीमात्र रस नाही, असं गावकऱ्यांनी प्रशासनाला सांगितलं.

नेमका प्रकार काय?

दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणाच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे. गाव सोडून गेलेले सर्व लोक आता लंगतच्या पाझर तलावालगत थांबले आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.






Link : https://www.tv9marathi.com/crime/100-dalits-from-amravati-leave-the-village-to-protest-against-communal-atrocities-563537.html/amp