डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय समाज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

माझ्या स्मारकाआधी तुमची ‘थडगी’ कशी झाली?

माझ्या स्मारकाआधी तुमची ‘थडगी’ कशी झाली?

Maharashtra Times | Updated Dec 3, 2017, 04:00 AM IST




संजय पवार

महाराष्ट्रभरातल्या, देशातल्या आणि विदेशातीलही माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो!

माझ्याच नावाने मिरवणाऱ्या तुम्हा सैनिकांना ‘तथाकथित’ म्हणताना मला काय वेदना होत असतील, याची पुसटशी जाणीव जरी तुम्हाला झाली तरी माझ्या या संवादाचे प्रयोजन साध्य झाले असे मी समजेन.

तथाकथित म्हणालो कारण आज देशभरात खंडीभर सेना आणि त्यांचे तेवढेच सैनिक सापडतील. माझे वडील सुभेदार होते आणि माझं बालपण कॅन्टोटमेंट परिसरात गेलं. ‘सैन्य, सेना आणि सैनिक’ याचं त्या काळातलं चित्रं व आजचं चित्र यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. पुढे माझी ओळख भीमा कोरेगावच्या महार पलटणीतील योद्ध्यांशी झाली. तो अभिमानास्पद इतिहास रक्तात घोळवून महाडचे चवदार तळे आणि काळाराम मंदिराच्या लढाईत मी आणि माझे सहकारी उतरलो, लढलो आणि जिंकलोही!

एका बाजूला गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची लढाई आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गतच फुले-शाहूंच्या वारसा आशीर्वादाने लढत असलेली जातीअंताची लढाई हा संघर्ष मोठा होता. पुढे पुणे करार, घटना समितीचा अध्यक्ष, संविधानाची निर्मिती, कायदा मंत्री, हिंदू कोड बिल, ते अर्धवट स्वीकारले म्हणून दिलेला राजीनामा आणि नंतरचे जाहीर धर्मांतर या सगळ्या कालखंडात जे माझ्या सोबत होते ते आज तुमच्यासारखे भीमसैनिक म्हणून कधी मिरवले नाहीत. समतेच्या विशाल व चिरस्थायी स्थापनेसाठी ते पायातले दगड झाले. त्यांच्यामुळेच तुम्हाला आज उभं राहायला जमीन लाभलीय!

‘घटनेचा शिल्पकार’ या शिवाय माझी इतर कुठलीच पात्रता या देशाने देशवासीयांना कधी दाखविली नाही. माझी डॉक्टरेट अर्थशास्त्रात आहे हे सर्व विसरले की दडवून ठेवले माहीत नाही! मी हे बदल पाहत होतो आणि मला दिसलं या नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गात माझा भीमसैनिकही आहे! सरकारी, निमसरकारी नोकऱ्यातला, बँकांतला, विद्यापीठातून, महाविद्यालयातून शिकविणारा, स्पर्धा परीक्षातून थेट आयएएस, आयपीएस झालेला. मी म्हटलं वा! चला, संविधानिक मार्गाने आरक्षणातून आपली पात्रता, गुणवत्ता सिद्ध करीत हा गावकुसाबाहेरचा समाज या ग्राहककेंद्री नवसमाजात मोठमोठाल्या मॉलमध्ये ट्रॉली ढकलत इतरांसोबत चालत कार्ड स्वाइप करतोय. सामानाने भरलेली ती ट्रॉली चारचाकी गाडीच्या डिकीत ठेवतोय. जाहिरातीत शोभावीत अशी बायका-मुलं घेऊन छान ऐटीत गाडी हाकतोय. सरकारी अधिकारी पदावर असणारांची ऐट तर बघण्यासारखी. वर कुणी डिवचलंच तर आमच्या बापाने (म्हणजे मी!) हा हक्क दिलाय असं पानमसाला थुंकत सांगणं. सफारी झटकून, खुर्चीमागच्या नॅपकिनने तोंड पुसणं, सगळंच कसं एका नव्या स्थित्यंतराचं जिवंत चित्रं!

पण याच चित्राची आणखी एक बाजू आहे. ती आहे वाढत्या शहरीकरणाची. भारतीय जातीव्यवस्थेचं मुख्य प्रारूप खेड्यांच्या गावगाड्यात आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे मीच या गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत समाजाला ‘शहराकडे चला’ असा स‌ल्ला दिला होता. त्याच वेळी गांधी खेड्याकडे चला म्हणत होते. मी सल्ला दिला तेव्हा औद्योगिकीकरणाने ‘कामगार’ जन्माला घातला होता. शहरात कामगारांची गरज होती आणि तो अपवाद वगळता ‘जाती’ ऐवजी ‘वर्ग’ म्हणून गणला जात होता. गिरण्या, छोटे-मोठे कारखाने, सरकारी कार्यालये, पालिका यातून तृतीय व विशेषतः चतुर्थ वर्गात हा बहिष्कृत समाज ‘कामगार’ म्हणून काम करू लागला. शहरांचे अनेक भाग कामगारांच्या वस्त्या म्हणून तयार झाले. त्यांना सरकारी घरेही मिळाली. मात्र ९०च्या जागतिकीकरणानंतर हा कामगारवर्ग उखडला गेला. जो नवा कामगार आला तो कंत्राटी मजूर म्हणून शहरातल्या बकाल वस्त्यात खेड्यापेक्षा वाईट पण जातनिरपेक्ष जगू लागला. या वस्त्या जशा गुंडांच्या तशाच राजकीय पक्षांच्याही झाल्या. आश्चर्य म्हणजे यापैकी काही वस्त्या या माझ्याच निळ्या झेंड्याचं निशाण फडकवताना दिसतात. भीमनगर, अशोकनगर, रमाई, मिलिंद, नागसेन अशी नावावरूनच ही नगरं ओळखता येतात. सांचीच्या स्तूपाचं प्रवेशद्वार, बुद्धविहार, वाचनालय, ध्वजस्तंभ त्यावर अशोक चक्र हा या वस्त्यांचा तोंडवळा. इथे राहणारा सगळा वर्ग हा स्वतःला ओरिजिनल ‘जय भीम’वाला समजतो. तो सर्व प्रतीके ठाशीवपणे वापरतो. जय भीम, निळे टिळे, उपरणी, झगमगाटी जयंती, पुण्यतिथी. पुढाऱ्यांचे गटतट. त्याप्रमाणे वस्त्यांचे वाटप. या वस्त्यांतून फेरफटका मारल्यावर माझ्या लक्षात आले की भीमराव, आता नाही रे वर्गातच दोन गट झालेत. एक नाही रे, एक आहे रे. आहे रे मघाशी नोंदवला तो सधन, संपन्न, सुविद्य. तर नाही रे निर्धन, विपन्न, सुविद्य पण संधी नाकारलेला. एक क्रिमीलेयरवाला तर दुसरा शहराच्या सर्वात खालच्या लेयरवाला. आणि इथूनच कडवे, म‍वाळ, बामणी, विकाऊ असे कप्पे झालेत. भीमसैनिक म्हणजे रस्त्यावर उतरून जय भीम आरोळी ठोकणारा, खर्चिक जयंती साजरी करणारा. राजकीय पक्षांशी व्यवहार करणारा प्रसंगी व्यसनात आणि गुन्हेगारी विश्वात गुरफटणारा. याउलट संपन्न वर्ग व्हाइट कॉलर, सर्व प्रकारच्या ठाशीव निळाईपासून दूर, अभिजनांच्या चर्चात मध्यम लयीत बोलणारा, कर्मकांडाकडे झुकू लागलेल्या बौद्ध चालीरीतीपासून अंतर राखणारा. सर्व समाजमान्य तरीही ‘दलित’ हे लेबल चिकटवले जाणारा.

या दोन टोकांच्या, एकाच विचारांच्या मात्र विरुद्ध आचारांच्या मध्ये आणखी एक तिसरा वर्ग आहे. जो या दोन्ही गटाचे मिश्रण आहे! हा वर्ग संपन्न आहे, सुविद्य आहे पण त्याचवेळी त्यात वस्ती पातळीवरचं कडवेपण आहे. तो आग्रहाने जय भीम म्हणतो. फ्लॅट किंवा बंगल्यात दर्शनी लक्षात येतील अशा माझ्या व बुद्धाच्या प्रतिमा, सोबतीला स्वतःची कुणा महनीयासोबतची छबी, काही पुरस्कार, स्मृतीचिन्हे. हे रविवारी शुभ्र वस्त्रे घालून विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण. भंतेजींना बोलवून घरगुती व सार्वजनिक कार्यक्रम. अलीकडे हा वर्ग बौद्ध तीर्थयात्राही काढतो. पण हे सगळं कडवेपण आपल्या कॉलनीत किंवा नोकरीच्या ठिकाणी SC. ST. युनियनमधून. सतत आरक्षण आणि आरक्षणावर आधारित प्रमोशन या चर्चेत रमणारा व इतर जातींकडे संशयाने पाहणारा हा वर्ग एका सुरक्षित बेटाची निर्मिती करून त्यात इतर जगाशी फटकून मर्यादित विश्वात जगत असतो. हा वर्ग क्रिमीलेयरसारखा सर्वमान्य होण्यापेक्षा स्वतःच्या जातीच्या वर्तुळातच सुरक्षित समजतो स्वतःला. पण जात्याभिमान म्हणून तो वस्ती पातळीवरील भीमसैनिकासारखा अस्तित्वाचा ठाशीवपणाही आपल्या बेटाबाहेर टाळतो.

क्रिमीलेयर आंबेडकरवादी, आपली ओळख निव्वळ दलित, आंबेडकरी न राहता ती व्यापक समाजचिंतक, सृजनशील व्यक्ती सामाजिक जाणीवेसह अशी ठसविण्याच्या प्रयत्नात असतो. वस्ती पातळीवरचा आक्रमक जय भीमवाला सब साले चोर है म्हणत सर्वच व्यवस्थांकडून आपली किंमत वसूल करण्यात किंवा हतबल होऊन विकाऊ होण्यात जिंदगी खर्च करतो. तर तिसरा गट ‘बौद्ध’ म्हणून ओळख ठसवताना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘गौतम बुद्ध’ यापलीकडे तिसरी व्यक्ती, जग, समाज आहे, तिथे काही घडतेय यापासून अनभिज्ञ, पर्यायाने अज्ञानात सुख मानणारा.

नामांतरानंतर आता गेली काही वर्षे माझ्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिल चर्चेत आहे. भाजपच्या केंद्र व राज्य सरकारांनी लंडनच्या घरापासून ते इंदू मिलच्या हस्तांतरात राजकीय सरशी करून घेतलीय. पण माझी चिंता आणि संताप हा आहे गांधींना केवळ ‘चष्म्यात’ शिल्लक ठेवणारं हे सरकार माझं कायमस्वरूपी ‘स्मारक’ करू इच्छित असताना त्रिभागलेला माझा समाज केवळ स्मारकाच्या तुकड्यावर समाधानी राहणार?

हे सरकार सत्तेत आल्या दिवसापासून असंविधानिक गोष्टी रेटून करतेय. संसदेच्या पायऱ्यावर डोकं टेकवून नंतर संसदेकडे न फिरकणारा, संसदीय परंपरांना न जुमानणारा पंतप्रधान हा देश पाहतोय. हुकूमशहाच ज्यांचे आदर्श आणि पुरोहितप्राधान्याची जातीव्यवस्था ज्यांच्या मनात, त्यांनी खाण्यापिण्यापासून, कलानिर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रांत झुंडशाही जन्माला घालून देश सोळाव्या शतकाकडे नेण्याचा उद्योग चालवलाय आणि माझे तथाकथित भीमसैनिक शांत आहेत!

मलाच शरम वाटली जेव्हा उनात जाहीरपणे उघड्या अंगावर ज्यांच्या चेल्यांनी फटके मारले त्यांच्याच मांडीला मांडी लावून माझा तथाकथित भीमसैनिक मंत्रिपदाची शपथ घेतो, सामाजिक न्यायखात्याचा राज्यमंत्री होतो आणि वर बाबासाहेबानंतरचा पहिला केंद्रीय मंत्री म्हणून मिरवतो? हिंदू कोड बिलासारख्या मूलभूत परिवर्तनाच्या मुद्द्यावरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि इथे ‘गुरा’साठी, गुरासारखा मार खाऊनही या मंत्र्यासह त्रिभागलेला तथाकथित भीमसैनिक थंड! ज्या सनातनी व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर झगडलो तीच सनातनी व्यवस्था संविधानातील आचार, विचार, आहार स्वातंत्र्यावर घाला घालत असताना त्यांचा कडाडून विरोध करण्याऐवजी मंत्रिपदाचे बिस्किट चघळत बसतो? यासाठीच का होता महाड, नाशिकचा संगर? यासाठीच का मनुस्मृती जाळून, बुद्धाला शरण गेलो होतो?

आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्‍गार किंवा घटनेला हात लावाल तर खबरदार! झोपेतून उठून एवढं एकच वाक्य बोलायचं आणि पुन्हा स्वतःच तयार केलेल्या ‘थडग्यात’ जाऊन झोपायचं!

कधी काळी विद्रोहाचं पाणी प्यायलेला, सूर्यकुळाचे वंशज म्हणवून घेणारा, प्रखर बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, जातीअंतासह समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आग्रही असणारा हा बंडखोर समाज आता वस्ती पातळीवर राजकीय पक्ष, झोपडी दादा, बिल्डर, माफिया यांच्यासाठी प्राइस टॅगसह अॅव्हेलेबल झालाय. निर्मितीक्षम सृजनात्मक काम करणारा सधन, संपन्न संपृक्त वर्ग आता ‘यू टर्न’ घेऊन व्यवस्थेतच कसं सर्वसमावेशक होता येईल यासाठीच्या आत शिरण्याच्या ‘फटी’ शोधतोय. तर बुद्धासोबत माझाही देव बनवलेला खास सरकारनिर्मित नवबौद्ध नवमध्यमवर्ग मूक कर्णबधीर झालाय!

माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो, घटना बदलली जाणार नाही, पण घटनेला हरताळ फासत राज्यात सत्तांतर घडवून आणली जाताहेत. कोंबडी, बकरी खाणारे बैल खाणाऱ्याला का व कोणत्या अधिकारात रोखू शकतात? जे आदिवासी साप, मुंगूस, कबूतर, घुशी, हरण, तितर असे विविध प्राणी खाऊन जगत होते आणि त्यासाठी त्याच प्राण्यांना जगवतही होते, त्यांना ‘वनवासी’ करून त्यांना वरण, भात, लिंबू व मेतकूट खायला घातले की त्यांचा विकास होईल हे घटनेतील कुठल्या कलमात आहे? धर्मांतरावर गळे काढणारे ‘आदिवासीचे वनवासी’ हे सांस्कृतिक आक्रमण कधी मान्य करणार? आणि ते कोण रोखणार? सर्व संविधानिक शिष्टाचार बाजूला सारत रात्रीत नोटबंदी होते, हजारो कामगारांचा रोजगार जातो, लघुउद्योग बंद पडतात, बँकांच्या रांगात माणसे मरतात, शेतकरी जमीनदोस्त होतो. एका माणसाच्या हट्टासाठी देश वेठीला धरला जातो तेव्हा कुठलं संविधान पाळलं जातं? घटना बदलणे यापेक्षा घटना बाजूला सारून, बेबंद वागणे हा घटनाद्रोह अधिक गंभीर आहे हे माझ्या तथाकथित भीमसैनिकांना कधी कळणार? आणि त्यांच्या मुठी वळणार?

लाखांचे मोर्चे काढून कोपर्डीचा न्याय फास्ट ट्रॅकवर मिळवून घेतला जातो पण त्याच जिल्ह्यातलं ‘खर्डा’ विसरलं जातं, खैरलांजीचा भोतमांगे अन्यायाच्या आगीतच होरपळत मरतो कारण सगळा समाजच थडग्यात निजलेला!

या देशाचे नागरिक म्हणून, हरेक असंविधानिक कृतीला विरोध करणे, त्यासाठी रस्त्यावर उतरणे, उच्चरवात काही सुनावणे हे ‘घटना बदला’पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. का राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यावरून सक्ती होते? का गोरक्षेसाठी माणसं मारली जातात? का पाकिस्तानात पाठवू या धमक्या दिल्या जातात? जे स्वतः खैबरखिंडीतून आले ते इतरांना चालते व्हा म्हणतात आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेता? हिंदू धर्माचा पूर्ण एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय करूनच आपण बौद्ध धम्म स्वीकारला ना? मग तीच सनातनी संस्कृती संविधानाच्या चौकटीतूनच संविधान टराटरा फाडतेय आणि तुमच्या विद्रोहाच्या पाण्याचे आईस क्यूब झालेले!

इंदू मिलची जागा माझ्या स्मारकासाठी निवडलीत तेव्हाच माझ्या छातीत कळ आली. ज्या मुंबई शहरात मी लेबर पार्टी काढली, जिथल्या लेबर कॅम्पात माझी चळवळ वाढली, त्या गिरणगावात मी राहिलो तो गिरणगाव कामगारांसह उद्‍ध्वस्त करून शहरीकरणाच्या नावाखाली नवश्रीमंतासाठी पद्धतशीरपणे गिरण्या संपवल्या, जिथे कामगारांच्या थडग्यावर चकचकीत इमले चढवले गेले अशाच एका कामगारांच्या थडग्यांनी आक्रंदणारी जागा माझ्या स्मारकासाठी निवडलीत. कामगारांच्या थडग्यावर माझं थडगं? या विचारानेच अंगावर काटा आला. माझ्या मागे माझ्या विचारांचेच थडगे उभारून त्याला ‘स्मारकाचे’ गोंडस नाव देणार त्यापेक्षा गिरणी कामगारांना तिथे घरे देऊन संविधान संकुल नाव दिलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. मला सतत एकाच जातीत कोंबणाऱ्या तुमच्यासह या देशाला मला केवळ दोनशे/तीनशे फुटाच्या पुतळ्यातूनच ‘उंची’ बहाल करायचीय?

आज कधी नव्हे इतकी विपरित स्थिती देशात आहे. विचारवंत, समाजचिंतक, परिवर्तनवाद्यांचे दिवसाढवळ्या खून होताहेत, खुनी मोकाट फिरताहेत, संविधानाच्या मूलभूत ढाच्यालाच धक्के देणारे आक्रमक, सनातनी निर्णय होताहेत आणि वर संविधान दौड आयोजित केली जातेय. परवा ती धावणारी माणसं पाहून मला वाटलं ही संविधान पळवून तर पळत नाहीएत ना?

माझ्या १२५व्या जन्मदिनानिमित्त खूप घोषणा झाल्या आणि शेवटी कशी तरी आद्याक्षरं जुळवत ‘भीम’ अॅप सादर केलं गेलं. ते कोण वापरतं? आणि वापरण्यासाठी ते चालू तरी होतं का?

७७ साली नेहरूंच्या कन्येने देशाचा तुरुंग केला आणि इंदिरा इज इंडियाची आरती गायली तेव्हा मला वाटलं आता आम्ही कष्टाने निर्मिलेलं संविधान गाडलं जातंय. पण आता परिस्थिती उलट आहे. त्यावेळी संविधान रक्षणासाठी गजाआड गेलेले भारतमातेच्या नावाखाली गोमातेला संविधानाची पाने चारा म्हणून खायला घालताहेत आणि विकासाची स्वप्ने दाखवत, विद्वेषाची बीजे पेरताहेत. स्वातंत्र्याचा संकोच होतोय. विचारांचा मुक्त अवकाश आक्रसला जातोय. माध्यमांचा घोडेबाजार तेजीत आहे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची कृत्रिम पैदास जोरात आहे. या सर्व असंविधानिक गोष्टींनी माझे ‘स्मारक’ त्यांनी कधीच बांधायला घेतलेय कारण माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो त्यांना कळलंय माझ्या स्मारकाआधी तुमची थडगी तयार झालीत!

६ डिसेंबरला या! परस्परांच्या थडग्यावर काही फुले वाहू!

माझ्यातला ‘साहेब’ पळवून, मला नावापुरता शिल्लक ठेवलेला तुमचा ‘बाबा’!

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

हक्क आरक्षणाचा

बाबासाहेबानी (मराठा)-ओबीसींसाठी      तयार  केलेल्या ३४० (हक्क-आरक्षणच्या )कलमाला
मात्र प्रचंड विरोध झाला.*
    
          कुणी विरोध केला त्यासाठी खरा इतिहास वाचा
                        👇
               नोट - वरिल इतिहास पुराव्या सहित                              उपलब्ध आहे.

        आपण भारतीय आहोत म्हणून भारताचा इतिहास माहिती असणे काळाची गरज आहे .

जो वाचायला कंटाळा करतो तो अर्धवट ज्ञान घेऊन फिरतो .
                        
         त्यासाठी खरा इतिहास वाचा
                           👇
    (मराठा-OBC)वाल्यां भावानो पूर्ण वाचा
कारण 
       मांग , म्हारं-म्हणजे ---अतिशुद्
      (मराठा-OBC) म्हणजे -----शुद्र

नोकरी  मिळाली  ना ? सेटल झालात ना?
मग  आपण  आपल्या  जात /समाज  बांधवासाठी  काय  केले  ?
आपण  आपल्या  लोकांना  जागृत  नाही  केले  तर  लोक  खुरपी घेवून  दारात  येतीलच
आणि  विचारतील ----
     तु लय शिकलास /शाना हायीस म्हणून तुला नोकरी नाही मिळाली तुझा  आजा-पंजा तुझ्या पेक्षा  लय हुषार होता तरी त्याला नोकरी नव्हती कारण त्यावेळी                            मराठा-(OBC) म्हणजे -----शुद्राला
नोकरी नव्हती -त्याने फक्त सेवा चाकरीच करायची
     आज २५०० वर्षानी घटनेमुळे आमच्या   समाजाचं  प्रतिनिधीत्व म्हणून  तुला
नोकरी मिळाली  तु काय केलस ?
खावून खावून पाठीमागे  हात  पूसलस ?
पैसे देऊन  पुरस्कार  मिळवलसं? शिकलास म्हणून  कथा  कविता करत फिरत राहिलास
  कथा  कविता बरोबरच   समाजात  येवून
जागृती  करावी  लागेल   खरं  खोटं  सांगाव
लागेल  नाहीतर  समाज  माफ करणार  नाही
जागृती चा अग्नी  अखंड  तेवत ठेव.
                           👇
१९४६ साली विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी ‘शुद्र पूर्वी कोण होते ?’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून शुद्रांचा (म्हणजे मराठा-ओबिसींचा) इतिहास त्यांनी प्रथम उजेडात आणला. याच दरम्यान शेतकऱ्यांचे एक मोठे नेते डॉ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी ‘मी राज्यघटनेमध्ये मराठा-ओबीसींसाठी महत्वाची तरतूद करणार आहे’ ही कल्पना देशमुखांना दिली होती. ‘व्हू वेअर द शूद्राज’ (शुद्र पूर्वी कोण होते) हा ग्रंथ नुकताच डॉ. बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केला होता आणि संविधानाच्या कामाला हात घातला होता. शुद्र -मराठा-समाजाच्या संदर्भात संशोधन करून स्वतंत्र पुस्तक लिहिले असल्याने मराठा-शूद्रांचा प्रश्न त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा आणि माहत्वाचा वाटत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी संविधानात आवश्यक त्या तरतुदी करता येऊ शकतील असा विश्वास त्यांना होता.

संविधान लिहित असतांना ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी त्यांनी पाहिल्यानादा ओबीसी समाजाचा विचार केला. मराठा-ओबीसी -समाजासाठी ३४० वे, अनुसूचित जातींसाठी ३४१ वे, तर अनुसूचित जमातींसाठी ३४२ वे कलम तयार केले. आणि ही सर्व कलमे घटना समितीकडून मंजूर करून घेतली. यापैकी अनुसूचित जातीच्या ३४१ व्या व अनुसूचित जमातीच्या ३४२ व्या कलमाला फारसा विरोध झाला नाही. ओबीसींसाठी तयार केलेल्या ३४० कलमाला मात्र प्रचंड विरोध झाला. ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वतंत्र कलम तयार केले आहे हे कळताच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद असे त्यावेळचे जवळ जवळ सर्वच नेते नाराज झाले. ‘कोण हे मराठा-ओबीसी ?’ असे वल्लभभाईंनी तुसडेपणाने विचारले. घटना समिती आणि संसदेतील हिंदुधर्मीय सदस्यांनीच या काल्माविरुद्ध आवाज उठवला. परंतु या विरोधाला डॉ. बाबासाहेबांनी भिक घातली नाही. त्यांनी मराठा-ओबीसी कोण आहेत आणि ते मागास का राहिलेत हे पटवून दिले आणि त्यांच्यासाठी ३४० व्या कलमाची तरतूद केली. अर्थात, घटनेत कलम घातले असले तरी या कलमाला असलेला उच्चवर्णीयांचा विरोध मावळला नाही तो नाहीच !

या कलमानुसार देशात मराठा-ओबीसी जाती नक्की किती व कोणत्या आहेत हे तपशीलवार शोधून काढणे आणि त्यांच्या मागासलेपणाचे कारण तपासून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिफारशी करणे यासाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. २६जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले. त्यानंतर लगेचच बाबासाहेबांनी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले. टाळाटाळ केली. त्याच वेळी हिंदू कोड बिलासंदर्भात बाबासाहेब काम करत होते आणि ते बिल लवकरात लवकर मंजूर कारावे असा आग्रह धरत होते. या दोनीही प्रश्नासंबंधीच्या बाबासाहेबांच्या मागणीला कोन्ग्रेसचे पुढारी वाटाण्याच्या अक्षता लावत होते. मराठा-ओबीसी समाजाकडे पहाण्याचा सरकारचा हा उपेक्षेचा दृष्टीकोन तसेच हिंदू कोड बिल संमत न करून स्त्रियांच्या प्रश्नाबाबत दाखवलेली अक्षम्य उदासीनता याचा निषेध म्हणून अखेर २७ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याने एकच हलकल्लोळ माजला. सरकार हादरले. डॉ. बाबासाहेब आता गप्प बसणार नाहीत याची नेहरूंना कल्पना आली. कारण त्याच सुमारास पंजाबराव देशमुख, आर. एल. चंद्र्पुरी यांच्यासारखे अनेक ओबीसी नेते डॉ. बाबासाहेबांच्या संपर्कात होते आणि या प्रश्नावर देशभर रान उठवण्यासंबंधी हालचाली करत होते. याचा सुगावा नेहरूंना लागला होता.

१९५२ साल उजाडले पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या डॉ. बाबासाहेबांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात ३४० व्या कलमानुसार ओबीसींसाठी आयोग स्थापन करण्याचे अभिवचन दिले. देशभरचा मराठा ओबीसी समाज काँग्रेस पासून दूर जाऊ शकतो आणि डॉ. बाबासाहेबांच्या पक्षाभोवती एकवटू शकतो हे चाणाक्ष नेहरूंच्या लक्षात आले. त्यांनी आयोगाचे आश्वासन द्यायला सुरुवात केली आणि अखेर २९ जानेवारी १९५३ ला दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला. कालेलकर हे कोकणस्थ ब्राह्मण होते आणि गांधीवादी होते. ब्राह्मणी सोवळ्याओवळ्यावर त्यांचा भर असे. आयोगाचे काम करतांना त्यांना देशभर फिरावे लागले. त्यावेळी त्यांना ब्राह्मण आचारी लागे. तशा सक्त सुचना ते जिथे जिथे जायचे तिथल्या स्टाफला आगाऊ करत असत.

३० मार्च १९५५ रोजी कालेलकरांनी आपला अहवाल राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद याना सादर केला. अहवालाचा सारांश पाहिल्यावर राजेंद्र प्रसाद भडकले. ‘स्वातंत्र्य मिळवलेय ते ह्या लोकांना मिठाई खिलवण्यासाठी काय ?’ असा कुत्सित शेरा त्यांनी मारला आणि पंडित नेहरूंना तात्काळ फोन करून आपली नाराजी प्रकट केली, नेहरूंनी हा अहवाल ताबडतोब मागवून शिफारशी वाचल्या त्यांनाही त्या आवडल्या नाहीत. लगेच त्यांनी कालेलकारांना बोलावून फैलावर घेतले. तुम्ही अहवाल लिहिला हे ठीक आहे, पण आता तो स्वीकारता येणार नाही अशी तरतूद करा असे बजावले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३१ मार्चला कालेलकरांनी ३१ पानी पत्र लिहून ‘आपण आयोगाचे अध्यक्ष असलो तरी या आयोगाने केलेल्या शिफारशींशी सहमत नाही’ असे स्पष्ट शब्दात कळवले. त्यामुळे आयोगाची अमलबजावणी तर सोडाच, आयोगाचा अहवाल संसदेत मांडला जाणार नाही याची तजवीज झाली. आयोगाचे अध्यक्षच या अहवालाशी सहमत नसल्यामुळे हा अहवाल संसदीय पटलावर ठेवण्याची व त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही असे जाहीर करण्यात आले. पुढे बरीच वर्षे हा अहवाल विस्मरणात गेला होता.

कालांतराने इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. १९७५ साली त्यांनी आणीबाणी लागू केली. त्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. या पक्षाने १९७७ची निवडणूक लढवली, या निवडणुकांना सामोरे जातांना जनता पक्षाने ‘कालेलकर अहवालाची अमलबजावणी करू’ असे आश्वासन दिले. निवडणुकीत कोन्ग्रेसचा पराभव झाला. जनता पक्षाचे राज्य आले, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. काही दिवसांनी ओबीसींचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले, तर ते म्हणाले, यह कालेलकर कमिशन पुराना हो गया है, अब हम ऐसा करेंगे, एक नया कमिशन बिठायेंगे !’ अशा तऱ्हेने निवडणुकांत दिलेल्या आश्वासनाचा भंग करून ओबीसींना धोका देण्यात आला.

१ जानेवारी १९७९ रोजी बिंदेश्वर प्रसाद मंडल या ओबीसी खासदाराच्या नेतृत्वाखाली नव्या आयोगाची स्थापना झाली. ३१ डिसेम्बर १९८० रोजी या आयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला. देशातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या ३७४४ ओबीसी जाती शोधून काढण्यात आल्या. महाराष्ट्रात ३६० जाती मराठाओबीसी असल्याचे निष्पन्न झाले. या जातींच्या उन्नतीसाठी मंडल आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण अशा शिफारशी केल्या. मराठा-ओबीसींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. परंतु १९८० ते १९९० या काळात केंद्र शासनाने या शिफारशी लागू करण्याबाबत जराही हालचाल केली नाही किंवा सहानुभूती दाखवली नाही. अक्षरश: दहा वर्षे हा अहवाल धूळ खात पडून राहिला.

याच दरम्यान देशभरातून मंडल आयोगाची अमलबजावणी करा अशी मागणी होत होती. मा. कांशीराम यांच्या संघटनेने दिल्लीत उपोषणे, आंदोलने केली. महाराष्ट्रात दलित प्यांथर तसेच रिपब्लिकन पक्षाने मोर्चे काढले, धरणे धरली, Adv. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, लक्ष्मण माने, Adv. एकनाथ साळवे, हनुमंत उपरे, श्रावण देवरे, हरी नरके असे असंख्य कार्यकर्ते या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले. Adv. जनार्धन पाटील यांचा मंडल आयोगाविषयीच्या प्रबोधनकार्यात पुढाकार होता. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या संघटनांचा या जागृतीत सिंहाचा वाटा होता. अक्षरश: शेकडो लोक तुरुंगात गेले. गंमत म्हणजे काही अपवाद वगळता मराठा-ओबीसी समाजाला हा अहवाल ओबीसींसाठी आहे याचा थांगपत्ताच नव्हता. ज्या अर्थी आंबेडकरी विचारांचे नेते या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले आहेत त्याअर्थी मंडल आयोग दलितांसाठीच आहे असा बहुसंख्य ओबीसींचा गैरसमज झाला होता.

अखेर ७ ओगस्ट १९९० रोजी तत्कालीन प्रधान मंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. घोषणा झाल्याबरोबर हिंदुत्वाचा पुकारा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा अनेक पक्ष संघटनांनी देशभर हैदोस घालून मंडल आयोगाला प्रचंड विरोध केला. मोर्चे, धरणे, रस्ता रोको, रेल रोको या गोष्टी तर त्यांनी केल्याच, परंतु मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलने केली. काही विद्यार्थ्यांनी तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. देशात सगळीकडे वातावरण तंग बनले. एव्हढे करूनही व्ही. पी. सिंग यांनी निर्णय बदलला नाही. आपले सरकार भाजपने बाहेरून दिलेल्या टेकूवर उभे आहे हे ठाऊक असतांनाही व्ही. पी. सिंग ठाम राहिले. शेवटी अडवाणींची रथयात्रा लालूप्रसाद यादव यांनी अडविल्याच्या कारणावरून भाजपने पाठींबा काढून घेतला आणि सरकार पाडले. ओबीसींची बाजू घेणाऱ्या ओबीसींना थोडाफार का होईना पण न्याय देवू करणाऱ्या सरकारला हिंदुत्ववाद्यांनी असा जबर धक्का दिला. ओबीसी हे कुणी मुसलमान किंवा ख्रिश्चन नव्हते. ते हिंदूच होते. तरीही हिंदुत्ववादी शक्तींना ओबीसींबद्धल बिलकुल प्रेम नव्हते ! कारण ओबीसी हे आपल्या धर्मव्यवस्थेतील शुद्र लोक आहेत, त्यांना उच्च शिक्षणाची, चांगल्या नोकर्यांची, चांगल्या राहणीमानाची आवश्यकता नाही ही हिंदूधर्माची धारणा त्यांच्या मनात पक्की रुजलेली होती. शूद्रांना (ओबीसीना) हलके लेखण्याची उच्चवर्णीयांची मानसिकता मंडलच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

मंडल आयोगाच्या माध्यमातून हळूहळू का होईना देशभरातला मराठा-ओबीसी जागृत होत आहे याचे अचूक भान संघपरिवाराला आले. ही जागृती अशीच वाढत राहिली तर बहुसंख्य असलेला हा समाज सत्ता, शिक्षण, संपत्ती, नोकरी, प्रतिष्ठा यातला आपला न्याय्य वाटा मागण्यासाठी संघर्ष करायला सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग समाज व्यवस्थेमधले उच्च वर्णीयांचे उच्च स्थान अबाधित राखणे अवघड होईल. हे त्यांनी ओळखले. हे होऊ द्यायचे नसल्यास एकच उपाय – Diversion of attention ! म्हणजे- दिशाभूल करणे, लक्ष दुसरीकडे वळवणे ! मंडल आयोगाच्या चळवळीला छेद द्यायचा असेल तर एखादा पर्यायी मुद्दा विशेषत: भावनिक / धार्मिक मुद्दा पुढे आणून त्यात ओबीसींना गुंतवले पाहिजे असा विचार सघपरिवारात होऊन राम मंदिराचे आंदोलन सुरु झाले. ‘आपण सारे हिंदू असून मुसलमान आपले दुश्मन आहेत. आपल्या देवाच्या रामाच्या जन्मभूमीच्या जागी आपल्या शत्रूची बाबरी मशीद आहे. ती जागा ताब्यात घेवून तिथे रामाचे मंदिर बांधणे आपले धर्मकर्तव्य आहे’ असा प्रचार त्यांनी सुरु केला. आयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही मागणी घेवून संघपरिवार पार खेड्यापाड्यापर्यंत गेला. धार्मिक भावनिक वातावरण तयार करण्यात आले. रामामांदिरासाठी गावा गावातून हळद-कुंकू वाहून विटा गोळा करण्यात आल्या. वातावरण मंदिरमय करण्यासाठी अडवाणीनी मुस्लिमांविरुद्ध धार्मिक भावना भडकवणारी रथयात्रा काढली. संपूर्ण भारतभर धर्मधुंद नशा पसरवण्यात आली. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा आक्रमक प्रचार करण्यात आला. या धर्मिक भावनिक प्रचाराला इथला ओबीसी हां हां म्हणता बळी पडला, त्या नादात मंडल आयोग विसरून गेला, मंडल मंडल म्हणण्याऐवजी तो कमंडल ss कमंडल ss म्हणू लागला. हिंदुत्ववाद्यांनी डाव साधला.

‘अरे हा आपलाच हिंदू बांधव आहे, तो मागास राहिलेला आहे, त्याला आरक्षण दिले पाहिजे’ असे या उच्च वर्णीयांना चुकुनही वाटले नाही. उलट ओबीसींनी मंडल कमिशन विसरावे यासाठी त्यांना धर्माच्या नशेचे इंजेक्शन देण्यात आले आणि ‘तुम्ही कडवट हिंदू आहात’ या भाषेत त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मुस्लिमांविरुद्ध चीथावाण्यात आले. म्हणजेच ज्यावेळी मराठा-ओबीसींच्या विकासाचा प्रश्न येतो त्यावेळी ओबीसी हे हिंदू असूनही शत्रू ठरतात, आणि इतर धर्मियांशी लढण्यासाठी मात्र त्यांना ‘कट्टर हिंदू’ म्हणून पुढे केले जाते ! ओबीसीही मग धर्माची राख डोक्यात घालून घेतात आणि फुकट मरतात. धर्माची धुंदी इतकी असते की आपले मित्र कोण ? शत्रू कोण ? आपले हित कशात आहे ? हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

मंडल आयोगातील शिफारशी –
*मराठा-ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात मंडल आयोगाने अनेक महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी खालीलप्रमाणे –
१. शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, अनुदानित खाजगी संस्था शासनाचे सार्वजनिक उपक्रम व उद्योग या सर्व ठिकाणी ओबीसीसाठी २७ टक्के जागा राखीव जागा ठेवाव्यात.
२. खुल्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या मराठा-ओबीसी उमेदवारांचा समावेश खुल्या गटात करण्यात यावा.
३. पदोन्नतीतही याच प्रकारचे आरक्षण हवे.
४. नोकरीसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करावी.
५. ज्या भागात इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे, तिथे प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करावेत. (पालकांचे किमान शिक्षण असल्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असे शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही.)
६. ओबीसी मराठा-विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व वसतीगृहे काढावीत.
७. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी इतरांच्या बरोबरीने येण्यास शाळा महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन (कोन्चींग क्लास)
८. मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय.
९. ओबीसींना उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यात यावी.
१०. कमाल जमीन धारणा कायद्याने अतिरिक्त जमीन ओबीसींना वाटून द्यावी.
११. शिफारशींच्या परिणामकारक अमलबजावणीसाठी सध्याच्या कायद्यात व नियमात आवश्यक ते बदल करावेत.
या अशा अनेक शिफारशी या आयोगाने केल्या होत्या. त्यापैकी फारच थोड्या शिफारशींची अमलबजावणी होणार हे स्पष्ट होते. कारण सर्वच शिफारशिंची अमलबजावणी करण्यात सत्ताधारी वर्गाला, मग तो कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा असो, अजिबात उत्साह नव्हता. सर्व शिफारशी आमलात आणल्या तर क्रांती होऊन आपल्याच हितसंबंधावर उद्या गदा येईल अशी भीती हे यामागील कारण असावे. (याबाबत सत्ताधारी कायम अलर्ट असतो.)

मंडल आयोगाच्या अंमल बजावणीचा निर्णय झाल्याबरोबर अहवालातील शिफारशींना आव्हान देत इंदर सहानी आणि अन्य तीस जण कोर्टात गेले. कोर्टात जाणारे हे सर्वजण उच्चवर्णीयच होते ! इंदर सहानी विरुद्ध केंद्र सरकार हा खटला त्यावेळी मंडल आयोगाचा खटला म्हणून विशेष गाजला. या केसचा निकाल १६ नोव्हेंबर १९९२ रोजी लागला. या निकालाने अक्षरश: ‘निकालच’ लावला. अहवालाच्या अमलबजावणीवर इतके निर्बंध लावले की ‘असून नसल्यासारखाच’ अशी त्याची गत झाली.

या निकालाने
१.मराठा-ओबीसी म्हणून आरक्षण घेवू पाहणाऱ्यांना ‘क्रिमीलेअर’चा निकष लावला.
२. एकूण आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये ही अट घातली.
३. मराठा-ओबीसींना पदोन्नती आरक्षण नाकारले.
४. देशात ३७४४ ओबीसी जाती असल्या तरी प्रत्यक्षात त्यातल्या १९८० जातींनाच आरक्षण मिळेल अशी अप्रत्यक्ष व्यवस्था केली.

कोर्टाच्या निकालपत्रातील या चारही आदेशांचा ओबीसींच्या आरक्षणावर दूरगामी आणि विपरीत परिणाम झाला. कोर्टाच्या निकालाद्वारे मंडल आयोग लुळा पांगळा करण्यात आला. मंडल आयोगाच्या माध्यमातून जागृत होत असलेला ओबीसी वर्ग त्यामुळे संभ्रमित झाला. चिडला. असे होणार हे गृहीत धरून चिडलेल्या ओबीसींचा राग दुसरीकडे वळवण्यासाठी (रागाचा निचरा करण्यासाठी) त्याच्यासमोर खोटा शत्रू मुसलमान ऑलरेडी उभा करण्यात आलाच होता. आणि राममंदिराचा प्रश्नही तयार करून ठेवला होता, तो जास्तच पेटवण्यात आला. या वातावरणाचे पर्यावसन ६ डिसेम्बर १९९२ या दिवशी आयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात झाले. न्यायालयाने दिलेल्या मांडलासंबधीच्या निकालानंतर अवघ्या वीस दिवसांनी ही घटना घडली. मशीद पडल्यानंतर देशभर दंगली उसळल्या. ( त्यानंतर आजपर्यंत भारतात दंगली, बॉम्बस्फोट, अशा प्रकारच्या ज्या ज्या घटना त्यातल्या जवळजवळ सर्व घटना बाबरी मशिदीच्या पतनाच्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आहेत असे समाजशास्त्रज्ञांचे व या विषयातील तज्ञांचे मत आहे.)

ज्यांनी ‘व्हू वेअर शुद्राज’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून मराठा-ओबीसींचे आत्मभान जागविले, त्यांच्यात चेतना निर्माण केली, विरोध होत असतांना संविधानात ३४० वे कलम घातले, त्याद्वारे मंडल आयोगाला जन्म दिला आणि ओबीसींना त्यांचे न्याय, रकहक्क व अधिकार मिळण्याचा मार्ग खुला केला, त्या डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनालाच हा तमाशा करण्यात आला.
                                                                           
       म्हणून आता तरी  जागा हो ?
शिकलास नव्हं?
डाॕ.  वकील, इंजी, गुरू  झालास  नव्हं?
जर हे समाजाला  समजलं
शिकुन सुद्धा  आम्ही  सामाजाला सांगितले 
नाही  तर पाठलाग  करून  आपल्याला
मारतील 
आमच्या  पुरस्कारासह  कथा कविता
कांदबर्या सह  आमाला  जाळतिल.

               👇फार महत्त्वाचे👇
गांधी काॅग्रेस आणि त्यांच्या चल्या चपाट्यांचा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना कट्टर विरोध असतांना सुध्दा
डाॅ. आंबेडकर हे भारताच्या संविधान सभेवर कसे निवडून गेले ?
                        👇

विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्षे संघर्ष करून भारतातील सर्व अस्पृश्यांना जागृत करून संघटित केले , आणि दि. 18,19,आणि 20 जुलै 1942 ला या सर्व अस्पृश्यांचे नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन घेतले ,  त्यामध्ये 75,000 कार्यकर्ते उपस्थित होते , त्यामध्ये 50,000 पुरूष व 25,000 महिला होत्या ,  अस्पृश्य वर्गामधील 1500 जाती होत्या ,
त्या सर्व जातींना जागृत करून जोडण्याचे महाकठीम काम डाॅ. आंबेडकरांनी केलं .
त्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर भारतातील गोरे अस्पृश्य , मध्ये भारतातील सावळे अस्पृश्य , दक्षिण भारतातील काळे अस्पृश्य , अशा सर्व अस्पृश्यांना एकत्र केले . थोडक्यात एक राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केले ,
या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा पाया त्यांनी अस्पृश्यांना  बनविले .

ज्यावेळी काॅन्ग्रेस + गांधीने डाॅ. आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नाही . त्यावेळी बंगाल मधील लोकांनी डाॅ. आंबेडकरांना बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढविण्याची विनंती केली .
मुस्लीम लीगचा मनुष्य जिथून निवडून जायचा  त्याने बाबासाहेबांसाठी ती जागा सोडली . नमोशुद्रा या जातीच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांना मते दिली .व महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला ,आणि काॅग्रेस व गांधीचा कट्टर विरोध असतांनासुध्दा बाबासाहेब त्यांच्या छाताडावर पाय देऊन संविधान सभेत निवडून गेले .
हे बाबासाहेबांनी 26 वर्षे संघर्ष करून निर्माण केलेल्या देशव्यापी , राष्ट्रव्यापी भारतव्यापी आंदोलनामुळे शक्य झाले .

बाबासाहेब संविधान सभेवर निवडून आले हे गांधी व त्यांच्या काॅग्रेसला सहन झाले नाही , म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूने  ज्या 4 (चार)  जिल्ह्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून पाठवले ते चारही जिल्हे - (1) . जस्सोर  (2). खुलना  (3). बोरीशाल  आणि (4).फरिदपूर हे चार जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले . आजही भारताचा व पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर हे चार जिल्हे ज्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून पाठविले, ते जिल्हे आता पाकिस्तान मध्ये आहेत .
पंडित नेहरूने या चार जिल्ह्यांवर सूड उगवला . त्या चार जिल्ह्यांचा दोष एवढाच की त्यांनी बाबासाहेबांना - मानवतेच्या मुक्तिदात्याला संविधान सभेत निवडून पाठविले.
ज्या मतदार संघातून डाॅ . आंबेडकर निवडून आले त्या मतदार संघातील चारही जिल्ह्यांना पंडित जवाहरलाल नेहरूने पाकिस्तानात टाकले. कोणत्या नेहरूने ?
ज्यांना आम्ही पंडित म्हणतो , ज्यांना आम्ही महान समाजवादी म्हणतो , ज्यांना आम्ही अधुनिक भारताचे निर्माते म्हणतो ,
एवढेच नाही तर ज्यांना आम्ही बच्चों के चाचा असेही म्हणतो .
त्या पंडित नेहरूने सूडाच्या भावनेने भारतातल्या चारही जिल्ह्यांना पाकिस्तानात टाकले .

भारत - पाक  फाळणीची अट खालील प्रमाणे होती .
.                          👇
ज्या विभागामध्ये 51% पेक्षा जास्त हिंदू असतील तो भाग भारतात ठेवायचा व ज्या विभागामध्ये 51%  पेक्षा जास्त मुसलमान असतील तो भाग  पाकिस्तानला द्यायचा .  ज्या चार जिल्ह्यांनी बाबासाहेबांना , गांधी + काॅन्ग्रेसच्या नाकावर टिचून संविधान सभेत निवडून  पाठविले त्या चार जिल्ह्यांमध्ये मध्ये (1) जस्सोर  , (2) खुलना , (3) बोरिशाल , आणि (4). फरिदपूर मध्ये  71% हिंदू होते .
खरे तर हे चारही  जिल्हे भारतातच ठेवायला हवे होते . परंतू त्या पंडित नेहरूने शिक्षा म्हणून हे भारताचे चार जिल्हे पाकिस्तानला दिले .
ज्या चार जिल्ह्यातील लोकांनी बाबासाहेबांना मते देवून संविधान सभेत निवडून पाठविले - आज युरेशियन ब्राम्हण लोक त्यांना बांगलादेशी घुसखोर म्हणतात व बांगला देशातील लोकंही त्यांना सहारा देत नाहीत .
"इकडे आड तिकडे विहीर " अशी स्थिती त्या लोकांची झाली आहे . 

सर्वात महत्वाचे म्हणजे डाॅ. आंबेडकरांना संविधान सभेत निवडून पाठविणारे चारही जिल्हे पाकिस्तानला दिल्यामुळे डाॅ. आंबेडकर हे पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले . भारतीय संविधान सभेचे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले .
व नंतर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले . व त्यांनी इंग्रज पंतप्रधान विस्टन चर्चिलची भेट घेतली . परंतू काही उपयोग झाला नाही .
त्यानंतर बाबासाहेबांनी  गांधी+काॅग्रेसच्या संविधानाला मी मान्यता देणार नाही अशी भूमिका घेतली .

इ.स. 1946 लाॅर्ड वेव्हेलने लंडनच्या रेडिओवरून एक घोषणा केली होती की,  " आता आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही , परंतू आम्ही भारत सोडून जाण्यापूर्वी भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान बनविले पाहिजे .
यात भारतातील सत्तेचे तीन वाटेकरी असतील , खालिल प्रमाणे .
                     👇

(1).सवर्ण,  (2).अस्पृश्य,  (3).मुसलमान.
   त्यावेळी भारतात तीन छावण्या होत्या .

(1) सवर्ण छावणी नेता    -  गांधी.

(2) अस्पृश्य छावणी नेता -डाॅ. आंबेडकर.

(3) मुस्लिम छावणी  नेता  -  बॅ. जीना .

दरम्यानच्या काळात डाॅ. आंबेडकरांनी संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता - व बहिष्कार टाकतांना त्यांनी म्हटले होते की - AC, ST, OBC ,NT , DNT ,VJNT ला संवैधानिक सुरक्षा मिळाली तरच अर्थात " Constitutionl Safe Guards " मिळाले तरच आम्ही संविधानाला मान्यता देऊ .
इकडे नेहरूला प्रधानमंत्री बनण्याची घाई झाली होती .
इंग्रजांनी , वरील तिघांनी मिळून संविधान लिहण्याची अट घातली होती आणि डाॅ. आंबेडकरांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता . करायचे तर काय करायचे ? काॅन्ग्रेस व गांधी पुढे धर्मसंकट निर्माण झाले .
तेंव्हा
गांधीने नेहरूला सल्ला दिला .

गांधी : नेहरू,डाॅ.आंबेडकर क्या चाहते है?

नेहरू: अपनें लोगों केलिए संवैधानिक सुरक्षा ।

गांधी : प्रधानमंत्री कौन बननेवाला हैं ?

नेहरू : मै. मैं ही प्रधानमंत्री बननेवाला हूॅ ।

गांधी  :  संविधानपर अंमल कौन करेगा ?

नेहरू :  मैं हि करूंगा ।

गांधी  :  तो ऐसा करो , डाॅ.आंबेडकर को संविधान लिखनेकी जिम्मेदारी दे दो । उन्हें जो जी चाहें लिखने दो । उसपर अंमल करना हैं या नहीं करना हैं यह तुम देख लेना  ।

आणि मग नेहरूचे डोळे चमकले . त्याला अत्यानंद झाला , त्यावेळी त्याला खरे गांधी कळाले .
लगेच नेहरूने बॅ. जयकरांना मुंबईमधून द्यायला लावला  व त्याच्या जागेवर डाॅ. आंबेडकरांना निवडून आणले व संविधान मसुदा समितीचे अध्यक्षही बनविले .

         🌻दोन समित्या नेमल्या🌻
                         👇

(1) मसुदा समिती अध्यक्ष -डाॅ.आंबेडकर
         (काम कलम लिहणे )

(2)घटना समिती अध्यक्ष- डाॅ.राजेंद्रप्रसाद.
     ( काम कलम मंजूर करणे .)
गांधी - काॅग्रेसने डाॅ. आंबेडकरांशी चर्चा , विचार - विमर्श किंवा सल्ला मसलत काहीच केली नव्हती .
"तुम्ही तुमच्या लोकांसाठी संवैधानिक सुरक्षा पाहिजे म्हणता ना - मग तुम्हीच मसुदा समितीचे चेअरमन व्हा आणि काय हवी तेवढी संवैधानिक सुरक्षा घ्या ."

गांधी + काॅन्ग्रेसचा हा डाॅ. आंबेडकरांना अडचणीत आणण्याचा डाव होता . परंतू गांधी + काॅग्रेसला काय माहित की डाॅ. आंबेडकर गांधी आणि काॅग्रेसचे बारसे आधीच जेवून बसले होते .

खरे तर डाॅ. आंबेडकरांना हेच हवे होते . म्हणून त्यांनी जाणिवपुर्वक  संविधान निर्माण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. 
थोडक्यात डाॅ. आंबेडकरांनी हवे ते मिळविण्यासाठीच हा डाव खेळला होता . त्यात डाॅ. आंबेडकर यशस्वी पण झाले .
गांधी आणि काॅग्रेसचे चेलेचपाटे बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून जाऊ देऊ इच्छित नव्हते , आंबेडकरांसाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडू इच्छित नव्हते .
आंबेडकर इथल्या बहुजन समाजाला संवैधानिक सुरक्षा दिल्याशिवाय संविधानाला मान्यता देत नव्हते , हा पेच निर्माण झाल्यामुळे गांधी आणि काॅग्रेसने डाॅ. आंबेडकरांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनविले .
.                        👇

अशा तर्हेने डाॅ. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले .

🌻 सात जणांची समिती नेमली 🌻

(1) अध्यक्ष - डाॅ. बी. आर. आंबेडकर .

(2) सदस्य - अल्लादी कृष्णस्वामीअय्यर

(3) सदस्य - एन.गोपालस्वामी अय्यंगार

(4) सदस्य - के. एम. मुन्शी

(5) सदस्य - सय्यद मोहंम्मद सादुल्लाह

(6) सदस्य - बी. एल. मित्तल

(7) सदस्य - डी. पि. खैतान .

अशा पध्दतीने संविधान  सभेने मसुदा समितीवर अध्यक्षा सहित सात सदस्य नियुक्त केले होते .  त्यापैकी  एकाने एकाच महिण्यात सभागृहाचा राजीनामा दिला ,

तिन महिण्याने एकाचा मृत्यू झाला ती जागा रिक्तच राहिली .
एकजण राजीनामा न देताच अमेरिकेला निघून गेला , ती पण जागा रिक्तच राहिली .

नंतर एक सदस्य राज्याच्या राजकारणात गुंतून पडला सभागृहात कधी आलाच नाही ,
त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली .  दोन व्यक्ती दिल्लीपासून खुपच लांब होत्या , त्यातल्या एकाची प्रकृतीही ठीक नसायची , त्यामुळे सहा महिण्याच्या नंतर  एकही सदस्य सभागृहाकडे फिरकलाच नाही .
बाबासाहेबांनी इंग्रजाना कळविले की सर्वच सदस्य गैहजरच राहतात सहा महिण्यापासून एकही सदस्य हजर नाही .
तेंव्हा इंग्रजांनी संम्पूर्ण संविधान निर्मितीची जबाबदारी बाबासाहेबांवरच सोपवली .
व ती जबाबदारी बाबासाहेबांनी उदारअंतकरणाने स्विकारली .व आठरा - आठरा तास अभ्यास  करून एकट्या बाबासाहेबांनी संविधान निर्मीतीचे काम अत्यंत योग्य प्रकारे व एकनिष्ठेने 2 वर्षे 11महिने 17 दिवसात पार पाडले . या देशाचा कायदा कानून बाबासाहेबांनी  लिहला ,हा देश संविधानावर चलतो . सत्ता कोणाचीही असो कायदा मात्र बाबासाहेबांचा आहे .
म्हणूनच त्यांना भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणतात .

संविधन लिखाणाचं काम चालू असतांना गांधी नेहरूं व सरदार पटेल राजेंद्र प्रसाद हे आंबेडकरांकडे आले व म्हणाले आंबेडकर साहेब तुम्ही तुमच्या स्वमताने या देशाचा कायदा बनवत आहात ठिक आहे ,
पण आमची एक कलम त्यामध्ये समाविष्ट करा ती म्हणजे या देशातल्या
ज्या नागरिकांच शिक्षण ग्रॅज्युयट असेल त्याच व्यक्तिला मतदानाचा अधिकार असावा .आणि जो व्यक्ति ग्रॅज्युयट असेल त्यालाच उमेदवारी पण दिली गेली पाहिजे .
मग ती उमेदवारी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत असावी .

हे ऐकून बाबासाहेब त्यांना म्हणाले आज या काळात ग्रॅज्युयट किती जमाती आहेत बोटावर मोजण्या इतक्याच आहेत आमच्या -SC, ST, मराठा-OBC  यांना शिक्षणाचा वारा सुध्दा माहित नाही निरक्षर आहेत मी त्यांना वार्यावर सोडणार नाही .
बाबासाहेबांनी गांधी नेहरूचं न ऐकता संविधानात निरक्षर व साक्षर माणसाला समान मतदानाचा व  समान उमेदवारीचा आधिकार बहाल केला .

युरेशियन ब्राम्हणांनी लिहलेल्या मनुस्मृतीने या देशातल्या सर्व बहुजनांना हकक अधिकारापासून वंचित केले . मनुस्मृतीने ज्या ज्या मुलनिवासी बहुजनांना हक्क अधिकारापासून वंचित केले त्या सर्व मुलनिवासी बहुजनांना " डाॅ. बाबासाहेब  आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे सर्व मानवी हक्क बहाल केले .

डाॅ. बी. आर. आंबेडकर