विद्यापीठ नामांतर लढा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विद्यापीठ नामांतर लढा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनी लाखो भीमअनुयायी उपस्थित

January 14, 2019  वास्तव संघर्ष  


औरंगाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन आज लाखो भीम अनुयायी यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ लाखो भीम अनुयायी राज्यातून शहिदांना अभिवादन करण्यासाठी आले होते. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप होतं.


१९७२ साली दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासारख्या काही मागण्यांसाठी दलित पँथरचं आंदोलन सुरु होतं. त्याबरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावे, ही मागणीने जोर धरला. १९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी या नामांतराचा पाठपुरावा करत होते

१९७७ ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं. १९७८ ला महाराष्ट्रात सरकार बदललं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारुढ झालं होतं. विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली. २७ जुलै १९९४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली.

नामांतराला शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचा विरोध असल्याने त्या वेळेस शिवसैनिक विरुद्ध दलित असा संघर्ष पाहण्यास मिळाला या संघर्षात माञ अनेक आंबेडकरी चळवळीतील आंदोलक तरुण कार्यकर्त्यांना हिंसेला सामोरे जावे लागले होते. या हिंसाचारामध्ये पोचिराम कांबळे या आंबेडकरी कार्यकर्ताचा मृत्यू देखील झाला होता.अखेर त्यांना आपल्या प्राणांची आहुती देण्यात आली.

दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्ताराला विरोध दर्शवला होता. पँथरला निर्भेळ नामांतर हवं होतं. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरु झाल्या. एक-दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. या आंदोलनात अनेकांनी प्राणांची आहुती दिली.




संदर्भ : http://vastavsangharsh.in/?p=1592