सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

मोहनराव भागवतांना खुले पञ!

मोहनराव भागवतांना खुले पञ!
प्रति,
मोहनराव मधुकरराव भागवत
सरसंघचालक (संघ प्रमुख)
नागपूर:- ४४०००९
महाराष्ट्र.
"भारताचा इतिहास हा बौद्ध धर्म आणि ब्राम्हणी धर्म यांच्यात प्रभुत्वासाठी झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे."
महोदय,
👉काही दिवसांपूर्वी हैद्राबादमधील एका कार्यक्रमात तुम्ही असे विधान केले कि, भारतीय राज्यघटनेत बदल करून भारतीय समाजाच्या नैतिक मूल्यांची पूर्तता करावी. संविधानातील अनेक भाग विदेशी विचारांवर आधारित आहेत, त्यामुळे स्वातंञ्याच्या ७० वर्षानंतर त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
👉 बाबासाहेब म्हणतात संसदीय लोकशाही ही बुद्धकालीन आहे, बुद्ध हे या भारत भूमीतील आहेत. मग कसे काय म्हणता येईल की संविधान हे पाश्चिमात्य संस्कृतीवर आधारित आहे? यासाठी मी २५ नोव्हेंबर, १९४९ च्या बाबासाहेबाच्या भाषणाचा संदर्भ देतोय. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही. एक काळ असा होता कि, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते कि, त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे, संघ हे दुसरे काही नसून संसदच होते, तर अाधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहित होते आणि त्यांचे ते पालन करीत होते.
👉मोहनराव, मी पहिल्यांदा थोडं तुम्हांला इतिहासात घेऊन जातो. प्राचीन भारतात धर्माचे रक्षक म्हणून ब्राम्हण नैतिक व आध्यात्मिक बाबतीत समाजाचे मार्गदर्शक असत. पण आज आम्हांला एकविसाव्या शतकात तुमच्या नैतिकतेची व अध्यात्माची काही एक आवश्यकता नाही. कारण भारताचे संविधान व बुध्दाचा धम्म आम्हांला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेक शिकवितो. या देशात भाजपाची सत्ता आल्यापासून भारतीय राजकारणात अनेक उलाढाली होत आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. भाजपा आणि RSS हे काही वेगळे नाहीत. दोघांचा अंजेडा एकच आहे. भाजपामधील सर्वच प्रमुख नेते हे RSS च्या छावणीतीलच आहेत. त्यामुळे संघाच्या अधिपत्याखाली राहून काम करणे हे त्यांना भाग आहे यात तीळमाञही शंका नाही. तुम्हांला या देशाचा सांस्कृतिक संघर्ष खूप चांगल्या प्रकारे समजला आणि तुम्ही त्या दिशेने वाटचाल केलीत आणि म्हणूनच त्याचे फळ तुम्हांला आज मिळाले आहे. (एक हाती सत्ता) आज याच गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही या देशात राजसत्तेच्या आधारावर धर्मसत्ता प्रस्थापित करु पाहत आहात आणि पुन्हा एकदा तुमचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहात.
👉आज तुमच्या पक्षाच्या हाती सत्ता आल्यामुळे तुम्ही तुमच्या हिंदुत्ववादी विचारधारेचा प्रचार प्रसार अधिक जोमाने करण्याचा प्रयत्न करीत आहात. तुमचे हिंदुत्व हे बेगडी आहे, हे अलीकडच्या पुण्यातील खोले बाईंच्या प्रकरणावरुन स्पष्ट झाले आहे. तुम्ही हिंदुत्ववादाचा खोटा बुरखा पांघरला आहे हे स्पष्ट आहे. या बुरख्याच्या आड तुमचा खरा चेहरा लपलेला आहे. तो या देशातील "गर्व से कहो हम हिंदू है।" अशी बोंब ठोकणाऱ्यांना आजवर दिसला नाही. पण आज माञ परिस्थिती बदलत आहे, तुमचा (संघाचा व भाजपाचा) खरा चेहरा, तुमची कूटनीती लोकांना कळून चुकली आहे. हिंदू धर्माचा बुरखा पांघरून तुम्ही आज भारतातील लोकांवर एकाधिकार गाजवण्याचा प्रयत्न करीत आहात याविषयी काहीच शंका नाही. ब्राम्हणशाहीने आपले स्वार्थी राजकारण लपविण्यासाठी धर्माचा बुरखा पांघरलेला आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमचा स्वार्थ साधण्याच्या हेतूनेच करीत असता हा इतिहास/वर्तमान आहे. हिंदुत्ववादी विचार संविधानाच्या माध्यमातून भारतीय जनतेवर कसे लादता येतील याचा तुम्ही लोक विचार करीत आहात. म्हणूनच तशा प्रकारचे पोषक वातावरण तयार व्हावे, भारतीयांच्या मनात राज्यघटनेबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा, त्यांनी घटना बदलण्याची मागणी करावी म्हणूनच तुम्ही आणि तुमचे काही चेले-चपाटे अनेक कार्यक्रमांतून संविधानाविषयी नरक ओकत राहतात आणि लोकांच्या भावनांशी खेळून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात.
👉मोहनराव, तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी हरिद्वारमध्ये एक विधान केले कि, जगात हिंदू हा एकमेव धर्म आहे, बाकी सर्व संप्रदाय आहेत. मला तुमच्यासारख्या महान(?), विद्वान(?) लोकांवर हसू येतं, याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही लोकं तुमच्या मतावर ठाम राहत नाहीत. वेळेनुसार, काळानुसार तुमची मते बदलत राहता अणि ती मते तुम्ही या भारतातील जनतेच्या मनावर थोपवण्याचा/लादण्याचा प्रयत्न करता, यात महत्वाची भूमिका असते ती तुमची दलाली करणाऱ्या टिव्ही मीडियाची व वर्तमानपत्रांची (अपवाद). हरिद्वारमध्ये तुम्ही म्हणालात कि, "हिंदू धर्माचा दरवाजा आजही सर्वांसाठी खुला आहे. कारण आम्हांला माहित आहे कि, आपल्या सर्वांचे पूर्वज हिंदू आहेत." मोहनराव, माझा तुम्हांला एक प्रश्न आहे, हिंदू धर्माचा संस्थापक कोण आहे?आणि हिंदू धर्म केव्हा अस्तित्वात आला? याचे अाधी उत्तर जाहिररित्या द्या. कोणाचे पूर्वज कोण आहेत आणि कोण नाहीत हा प्रश्न आधी बाजूला राहू द्या. मोहनराव, मला या गोष्टीची कल्पना आहे कि, बाबासाहेबांचे विचार तुम्हांला पचणार नाहीत, बाबासाहेबांचे विचार पचायला तुम्हांला खूप जड जातील/जात आहेत. कारण तुमच्याकडे पचवण्याची क्षमता कमी आहे. म्हणून मला याठिकाणी तुम्हांला प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची आठवण करुन द्यावीशी वाटते.
👉प्रबोधनकार ठाकरे म्हणतात कि, ''हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही.'' यावर तुमचे काय मत आहे?प्रबोधनकारांच्या विश्लेषणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? याचे देखील उत्तर द्यावे. मनुस्मृतीला धर्मग्रंथ मानणे हे फारच विसंगत वाटते कारण हे आहे कि, हिंदू धर्म हाच मुळी भ्रामक आहे. अनेक लेखकांनी याची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली आहे.
👉मोहनराव, मी तुम्हांला दुसरा मुद्दा हिंदू धर्माविषयी अधिक सांगणार नाही. कारण कितीही प्रयत्न केला तरी हिंदू धर्मात सुधारणा आणि त्यातील जातीभेद नष्ट होणार नाहीत. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी याआधीच सांगितले आहे. त्यामुळे त्यावर सविस्तर लिहावे हे मला तरी उचित वाटत नाही. मी पहिल्या मुद्याबाबत (भारताचे संविधान) तुमच्या मनात असलेल्या शंका दूर करणार आहे.
👉मी आज या खुल्या पञाच्या माध्यमातून तुमच्या मनातील शंका तसेच काही इतर प्रश्नांचे निरसन करणार आहे. तो विषय म्हणजे आपली राज्यघटना बदलण्याची गरज आहे तसेच दुसरा एक विषय आहे ज्याविषयी तुमचे चेले अनेकवेळा नरक ओकत असतात तो विषय म्हणजे भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नाहीत. मी या ठिकाणी काही ऐतिहासिक तसेच आजच्या परिस्थितीतील काही दिग्गज मान्यवरांचे व वेगवेगळ्या पुस्तकांत नमूद असलेले भारतीय राज्यघटना व राज्यघटनेचे निर्माते यांच्याविषयी मत काय होते/ काय आहे याचे दाखले देणार आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक वाचावेत.
👉आजच्या काळात काही अतिशहाणे, अक्कलशून्य, बिनडोक, बोलघेवडे, ज्यांना कायद्याचे शून्य ज्ञान आहे असे तुमच्या संघातील लोक राज्यघटना बदलण्याची व राज्यघटना निर्मात्याविषयी जी काही बिनबुडाची तसेच अर्थशून्य विधाने करतात. हे सर्व ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर मला बाबासाहेबांचे एक वाक्य आठवते, ते पुढीलप्रमाणे…
मी जी चांगली 'राज्यघटना' तयार केली ती म्हणजे आता उकिरडयावर आम्ही 'राजवाडा' उभारला असे वाटू लागले आहे.
👉मोहनराव, तुम्ही सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या कि, आपल्या देशाचा राज्यकारभार हा संविधानाप्रमाणे चालतो, कुठल्याही धर्मग्रंथाप्रमाणे नाही.
👉विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे, ११ महीने, १८ दिवस अनेक देशातील घटनांचा सतत सखोल अभ्यास करुन भारतीय संविधानाची निर्मिती केली. निरनिराळ्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करुन एक आदर्श राज्यघटना तयार केली. संविधान लिहिताना डॉ.बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी देखील घेतली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करुन भारताची राज्यघटना बनविली. भारताची राज्यघटना लिहिताना तिला लोकसत्ताक राज्याची बैठक देण्याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केले. त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंञ्य, समता व बंधुता या ञयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले. भारतीय राज्यघटना कोणत्याही धर्मियांच्या खासगी धर्मजीवनात हस्तक्षेप करीत नाही. संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य सर्व नागरिकांना दिलेले आहे. त्याचप्रमाणे शासन स्वतः कोणताही धर्म पुरस्कारीत नाही. केवळ शासन किंवा राज्यघटना यांचेपुरते बोलायचे झाले तर भारतीय राज्यघटनेने कोणताच धर्म अधिकृत धर्म मानलेला नाही.
👉मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते, त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली, अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे. सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ" पुस्तकाचा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्यांना, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन, "बाबासाहेब हे भारतीय घटनेचे निर्माते नव्हतेच !" असे सांगून सर्व-सामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे, घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तत्कालीन मान्यवरांची आहेत.
👉मसुदा समितीचे एक सभासद टी.टी.कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात, "सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला. त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चवथे सभासद संस्थानिकां संबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते ही उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना तयार करण्याचा सर्व भार एकट्या डॉ.आंबेडकारांवरच पडला. अशा स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."
👉घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात, "या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्या प्रभुत्वाने डॉ.आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालित केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
👉घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणाले, "या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
👉मोहनराव, आपण जर भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांविषयी विविध तज्ज्ञ लोकांकडून मते घेतली तर त्यांच्या संकलनाचा एक मोठा ग्रंथ तयार होईल. परंतु इथे मी तुमच्यासाठी काही महानुभवी लोकांची मते देणार आहे.
💥 डॉ.लक्ष्मीमल्ल सिंघवी:- (राज्यघटना विशेषतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालय वकिल) आपली राज्यघटना हे या काळातील सर्वात मोठे यश आहे. भारतीय राजकारण आणि लोकांच्या राष्ट्रीय सहमतीच्या आधार स्वरुपामध्ये आपली राज्यघटना एक प्रतीक तयार झाले. राज्यघटना केवळ भारतीय इतिहासातील श्रेष्ठ यश नाही तर माझ्या मते जगभरातील समकालीन राज्यघटना शास्ञ पाहिले आणि तुलना केली तर भारताला राज्यघटना हे एका मार्गदर्शकाच्या रूपामध्ये प्राप्त झाले आहे. ही मार्गदर्शिका जगातील राजकारण शास्ञ, भारताचा स्वातंत्र्याचा संघर्ष आणि अनेक देशांच्या राज्यघटनांच्या विचार मंथनातून निर्माण होवून आपल्याला प्राप्त झाली आहे.
💥 डॉ.सुभाष कश्यप:- (राज्यघटना पुनरावलोकन आयोग सदस्य) इतक्या विशाल आणि विविधतापूर्ण देशाची इतकी चांगली राज्यघटना आणि तीही इतक्या कमी वेळात (साधारण तीन वर्षे) तयार होणे हे आपल्या कायदेपंडित आणि घटना निर्मात्याचे यश आहे. गेली ५१ वर्षे अनेक राज्यघटना डगमगून जाताना आपण पाहिले आहेत. परंतु आपली राज्यघटना माञ सुस्थितीमध्ये आहे. याच्या अंतर्गत देशाची एकता आणि लोकशाही सुरक्षित राहू शकते. असे असताना, दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. आपली घटना माञ या कसोटीवर टिकली आहे. घटनेअंतर्गत राहून देशाने मोठी प्रगती केली आहे. हे घटनेचे यश आहे. कितीतरी बाह्य आक्रमणांचा सामना आणि कितीतरी अंतर्गत कठीण प्रसंगांचा सामना अशा घटनेच्या अंतर्गतच केला जावू शकतो.
💥 नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखी एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान.
💥 सुनील कुमार गौतम (भारतीय पुलिस सेवा IPS):- संविधान निर्माता डॉ.भीमराव रामजी आंबेडकर की विलक्षण प्रतिभा और सूझबूझ से हमें दुनिया का सबसे बेहतरीन संविधान मिला।
💥 सरन्यायाधीश कपाडिया:- आजच्या काळात धर्मग्रंथांची जागा राज्यघटनेने घेतलेली आहे. नागरिकांचे अधिकार, हक्क जाणून घेण्यासाठी प्रत्येकानेच राज्यघटना अभ्यासली पाहिजे. संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तीच खरी श्रध्दांजली ठरेल. आपली राज्यघटना ही मानवता, सामाजिक, आर्थिक, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा उदात्त मूल्यांनी ओतप्रोत भरलेली आहे. ती आत्मसात केली तर नीतीमूल्यांसाठी अन्य धार्मिक पुस्तके चाळण्याची गरज पडणार नाही.
💥 सरकारी वकील उज्वल निकम यांच्या ABP माझा च्या मुलाखतीतला काही भाग:- भारतीय राज्यघटना खूप चांगली आहे अणि खूप पावरफूल आहे. भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास काही देश करत आहे एवढी ताकत या राज्यघटनेमध्ये आहे. पण काही राजकारणी लोक असे आहेत की, त्यांच्या दबावामुळे तसेच पोलिसांना एखाद्या गुन्हाबद्दल सक्षम पुरावा न भेटणे या प्रकारांमुळे गुन्हेगार मोकाट सुटतात. त्यामध्ये घटना कमकुवत आहे अस बोलणारे खरोखर 'अडाणी' आहेत. आपली घटना सक्षम आहे. काही देशात भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला जातो. एवढी मजबूत आपली राज्यघटना आहे. याचा एक वकील म्हणून मला अभिमान आहे.
👉 मोहनराव, आता आपण शेवटाकडे वळूया. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने केलेल्या प्रचंड जयजयकारात वादविवादाला उत्तर देण्यासाठी राज्यघटनेचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करण्यास उभे राहिले. राज्यघटनेच्या गुणांविषयी बोलताना ते म्हणाले, 'राज्यघटना कितीही चांगली वा वाईट असली तरी शेवटी ती चांगली कि वाईट हे ठरणे हे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील त्यांच्यावरच अवलंबून राहील.'
👉मोहनराव धम्म, संविधान आणि रिपब्लिकन पक्ष हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेले नवे ञिसरण आहे. धर्मातीततेच्या सुंदर महामार्गावरुन स्वातंञ्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या ध्येयाकडे होणारा प्रवास या ञिसरणानेच शक्य होऊ शकतो. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने या देशातील सर्व नागरिकांचा विचार करुनच त्यांच्या कल्याणासाठी संविधान तयार केले आहे. त्या महामानवाचे अनुयायी जोपर्यंत जागरुक आहेत तोपर्यंत तुमचे मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत.
👉मोहनराव, मी तुम्हांला शेवटी एका गोष्टीची आठवण करुन देतो, तुमच्या रेशीमबागेतील शिकवणी घेऊन एक चायवाला ते आज देशाच्या प्रधानमंत्री पदावर विराजमान झालेले मा.नरेंद्र मोदीजी त्यांच्या विदेशी दौऱ्यात अनेकवेळा सांगतात कि, मी बुद्धाच्या भूमीतून (भारत) आलो आहे आणि हे निर्विवाद सत्य आहे. हे तुम्हांलादेखील माहिती आहे, भलेही तुम्ही ही गोष्ट सर्वांसमोर मान्य करा अथवा मान्य करु नका. पण जगात भारत ही बुद्धाची भूमी म्हणूनच ओळखली जाते, ओळखली जाईल. आज जगाला बुद्धाची गरज आहे आणि भारतात संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया ची गरज आहे.

जय भीम!
जय बुध्द!!
जय रिपब्लिक इंडिया!!!

लेखन,
The Republican,
सुरज प्रकाश तळवटकर®✍
#क्रांतीभूमी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा