जातीव्यवस्था नष्ट केल्याशिवाय धार्मिक दंगली रोखता येणार नाहीत.
- संदीप महाडीक ( क्रांतीभूमी ) 9222437849
इतिहासाकडे पाहाण्याची वेगळी पण तर्कशुद्ध दृष्टी विकसित करणारा
"हू वेअर द शुद्राज"
1946 साली प्रकाशित झालेला डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ या ग्रंथाच्या प्रस्थावनेत त्यांनी या ग्रंथासाठी 15 वर्षाचा उल्लेख केला आहे. भारतीय संस्कृतीच्या क्रांतीचा आणि प्रतिक्रांतीचा परामर्श त्यांनी या ग्रंथात घेतला आहे. मनुस्मृती कायद्यानुसार ब्राह्मण व शुद्र असे फक्त दोनच वर्ण अस्तित्वात आहेत हे समजण्यासाठी एक पूर्वीची म्हण आहे "ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ठ तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असे धर्मशास्त्र सांगते. यावरून आपल्याला समजले असेल तुम्ही ब्राह्मण नसाल तर नि:संशय शुद्र आहात. याचाच अर्थ छत्रपत्ती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक उच्चवर्गीयांनी नाकारला हा इतिहास असून स्वतःला 96 कुळी मराठा कुणबी म्हणवून घेणारे शुद्र म्हणून आपली ओळख दाखविण्यास कचरतात, गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणावयास सांगणाऱ्यांना विचारा हिंदुत्वाचा गर्व बाळगावयाचा म्हणजे आम्ही ब्राह्मणापेक्षा जन्मतःच नीच असे शुद्र असल्याचे गर्वाने कबूल करायचे का ? बाबासाहेब या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात "हिंदी - आर्य समाजातील शूद्रांच्या जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी ही देहदंडांची व निर्बधांची पद्धत प्रथमच तयार केली." धर्माचा पाठिंबा वर्णव्यवस्थेला मिळाला केवळ यामुळे वर्णव्यवस्थेचे अस्तित्व कायम टिकून राहिले वर्णव्यवस्थेची अमलबजावणी करणारा कायदा अस्तित्वात नसताही वर्णव्यवस्था टिकून राहिली हे सिद्ध करण्याचा एक पुरावा म्हणजे असा की शुद्र लोक व अस्पृश्य लोक यांना हिंदू समाजात प्राचीन काळी जे स्थान होते तेच स्थान आतापर्यन्त टिकून राहिले आहे" हा ग्रंथ सादर करता अनेक अडचणी आल्या पण पुस्तकातच डॉ बाबासाहेबांनी एक प्रसंग म्हणून डॉ जॉन्सन यांच्या मताची दखल घेतली आहे ती अशी "मी चोराला पकडणार आहे हे पाहुन गुंडांनी मला धमक्या दिल्या आहेत पण गुंडांच्या धमक्यांनी घाबरुन जाऊन मी चोराला पकडण्याचे सोडून देणार नाही" " काहीही होवो हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांचे संशोधन करतांना मला जेवढे ऐतिहासिक सत्ये दिसून येतील तेवढी मी जगाच्या चव्हाट्यावर मांडेन व हे कार्य करतांना डॉ. जॉन्सन यांचा दृढनिश्रय मी माझ्या डोळ्यांपुढे आदर्श म्हणून ठेवीन, हे कार्य हाती घेण्यास माझा हेतु एवढाच आहे की, पवित्र धर्म ग्रंथांत जे आदेश व जे नीतीनियम सांगण्यात आले आहेत ते नियम हिंदूंच्या, देशात व समाजाच्या ऱ्हासाला आणि अध:पाताला कारणीभुत झालेले आहेत.ही गोष्ट माझी ऐतिहासिक तत्त्वे समजल्यानंतर हिंदूंना पटून यावी, दूसरी गोष्ट ही की मला पवित्र ग्रंथांसंबंधी काय म्हणावयाचे आहे हे समजून घेण्यास जर सध्याच्या पिढीतील हिंदू लोक तयार नसतील तर पुढच्या पिढीतील हिंदू लोक तयार होतील याची मला खात्री आहे. या बाबतीत मला यश येणार नाही, अशी निराशा माझ्या मनात येतच नाही." ब्राह्मण ज्या दृष्टीने पाहतो त्याच्या अगदी उलट दृष्टीने ब्राह्मणेतर त्या वाङ्ममयाकडे पाहतो मी ब्राह्मणेतर आहे. ब्राह्मणेतर सुद्धा नव्हे मी अस्पृश्य आहे." अज्ञानी आणि पूर्व दिव्य माहिती नसलेल्या शूद्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे." शूद्रांची अधोगती घडवून आणण्यात जरी चातुर्वणर्याची दृष्ट आणि कलंकित पद्धत प्रामुख्याने कारणीभूत झाली तरी तिला टिकवून धरण्याचा बराच कार्यभाग शूद्रांनी केला आहे, असे ठंकावून सांगणारे बाबासाहेब म्हणून वाचने गरजेचे आहेत
संविधानाच्या कलम 51 क नुसार विज्ञाननिष्ठा पाळण्यास आम्ही बंधनकारक आहोत. आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्य, समता , बंधुता , धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद व विज्ञाननिष्ठा या मूल्यांचा संस्कार व्हावा हा हेतू या लेखांचय निवडीमागे
सर्वसामान्य लोकांचे सर्वांगीण विचार करणारा एकही ब्राह्मण या देशात निर्माण झाला नाही , होणार नाही.
अधिक माहितीसाठी पुस्तकातील अंतरंग
अनुक्रमाणिका
1 👉 प्रस्तावना
2 👉🏻 शूद्रांचा कूट प्रश्नं
3 👉🏻 शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत
4 👉🏻 शूद्रांचा दर्जा कोणता, याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय
5 👉🏻 शुद्र आणि आर्य यांचा झगडा
6 👉🏻 आर्यांचा परस्परांतील झगडा
7 👉🏻 शुद्र आणि दास
8 👉🏻 शुद्र पूर्वीचे क्षत्रिय होते
9 👉🏻 वर्णांची संख्या तीन की चार ?
10 👉🏻 ब्राह्मण व शुद्र यांचा झगडा
11 👉🏻 ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले ?
12 👉🏻 समेटाचा वृत्तान्त
13 👉🏻 सिद्धांताची कसोटी
"शुद्र पूर्वी कोण होते ? "
लेखक - डॉ भीमराव रामजी आंबेडकर
"एम,ए,पी.एच,डी,डी.एस,सी,एल,एल,डी;डी.लिट; बार - ऑट लॉ "
प्रकाशन - सुगत नागपुर
अनुवादक - चांगदेव भगवानराव खेरेमोडे
जय भीम विश्व बुद्धीजीवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन व्यापक शुषम व दृरष्टिकोनातून आहे
उत्तर द्याहटवाम्हणून वाचाल तर वाचाल
जयभिम 💐🙏🏻